कोविड नियमांचा उल्लंघन : शोध पथकाची ५ लॉन वर कारवाई

नागपूर :   नागपूर महानगरपालिके तर्फे गुरुवारी (१३ जानेवारी) रोजी १३ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून दोन लाख पाच हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने मंगळवारी झोन अंतर्गत के आर सी लाँन , गोरेवाडा रोड, एन एल विला, अवस्थी चौक, एहबब कॉम्युनिटी हॉल, अनंत नगर यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु ६५,००० च्या दंड वसूल केला. तसेच गांधीबाग झोन अंतर्गत आई साहेब सभागृह, रेशीमबाग येथे सुद्धा कारवाई करून १५,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत परंपरा लाँन वर सुद्धा रु २५००० चा दंड लावण्यात आला.
पथकाने ५८ पतंग दुकानांची तपासणी करून २०० पतंग जब्त केली आणि रु १०००० च्या दंड केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

नासुप्रकडून हस्तांतरीत उद्यानांचा अहवाल महापौरांकडे सुपूर्द

Fri Jan 14 , 2022
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासद्वारे नागपूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या उद्यानांच्या प्रत्यक्ष स्थिती संदर्भातील अहवाल गुरूवारी (ता.१३) महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. उद्यानांच्या स्थितीसंदर्भात मनपाद्वारे स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्यात आली होती. समितीच्या अभिप्रायाचा अंतिम अहवाल स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी महापौरांकडे सादर केला. यावेळी स्थापत्य समिती उपसभापती निशांत गांधी, सदस्या वंदना चांदेकर उपस्थित होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com