-काम बंद आंदोलन करण्याचा इशारा
-राष्ट्रवादी काँग्रेसचे भुषण चंद्रशेखर यांना मागितला पाठिंबा
-करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला प्रतिसाद म्हणून सर्व कामगारांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत
नागपूर – महानिर्मिती ३x६६० कोराडी वीज केंद्राच्या राख हाताळणी विभागातील कंत्राटी कामगारांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे भुषण चंद्रशेखर जिल्हा उपाध्यक्ष, नागपूर (ग्रा.) यांच्या माध्यमातून वारंवार मुख्य अभियंता प्रकाश खंडारे व कोराडी वीज प्रशासनाला कामगारांच्या समस्यांबाबत तक्रार पत्र दिले. वर्तमानपत्रात बातम्या प्रसारित झाल्या. पण शिस्त व वर्तूणुकीच्या नावाखाली कंत्राटी कामगारांसाठी परिपत्रके काढणारे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे व संबंधित विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून राख हाताळणी विभागातील कामगार समस्या संदर्भात कधीही बैठका घेतल्या नाही. त्यामुळे कंत्राटदार ए.बी.यु.कन्स्ट्रक्शन सह महानिर्मिती अधिकाऱ्यांची मुजोरी व अरेरावी वाढली.असे कामगारांनी पत्रकात नमूद केले.
महानिर्मिती ३x६६० कोराडी वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांना कंत्राटदारावर कार्यवाही करण्यास जागे करण्यासाठी येत्या २-३ दिवसात काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे भुषण चंद्रशेखर आमची सत्याची बाजू नेहमी मांडत असतात. यात आम्हाला कोणत्याही प्रकारची शंका नाही. कोराडी वीज केंद्रातील अधिकारी पूर्णपणे भ्रष्टाचारातून कार्यरत असल्याने कंत्राटदारावर कार्यवाही करण्यास ते दुर्लक्ष करत आहे. असे कामगारांना स्पष्टपणे दिसून येते. कोराडी वीज केंद्राच्या मुख्य अभियंत्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी राख हाताळणी विभागातील प्रत्येक कंत्राटी कामगार काम बंद आंदोलन करण्यासाठी निडरपणे उभा आहे. या करिता सर्व कंत्राटी कामगारांनी स्वाक्षरी सह सहमती पत्र भुषण चंद्रशेखर यांना दिले. त्याची माहितीपत्र महानिर्मिती कोराडी चे मुख्य अभियंता, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी, उप औद्योगिक संबंध अधिकारी व विभाग प्रमुख कार्यकारी अभियंता राख हाताळणी विभाग यांना ही देण्यात आले. कोराडी वीज केंद्राचे अधिकारी व कंत्राटदार मे.ए.बी.यु. कन्स्ट्रक्शन च्या संगनमताने होणाऱ्या त्रासाला थांबविण्यासाठी तात्काळ कंत्राटी कामगारांची सत्याची बाजू महानिर्मिती व शासनाकडे प्रखरपणे मांडण्यास भुषण चंद्रशेखर यांना लेखी निवेदनातून विनवणी केली.
राख हाताळणी विभागातील कंत्राटी कामगारांनी कामावर शांतपणे उभे राहून काम बंद आंदोलन करण्याचे ठरविले. आमच्या समस्येवर लवकर तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा कामगारांनी दिला.