अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – मी सुध्दा अंगणवाडीतुन घडलेला आहे.त्यामुळे मला जाणीव आहे.महिला व किशोरवयीन पोषण आहार ,आरोग्य बदल काळजी घ्यावी असे तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथे राष्ट्रिय पोषण आहार अभियान कार्यक्रमात बोलताना किरण पारधी जिल्हा परिषद सदस्य यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणात व्यक्त केले. राष्ट्रीय पोषण आहार अभियान साजरा करण्याच्या उद्देशाने शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रम कमलेश अतिलकर ग्राम पंचायत सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली तर उद्घाटक म्हणून मुंडीकोटा क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य किरण पारधी, विशेष अतिथी म्हणून संजय गणवीर जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बालविकास विभाग जिल्हा परिषद गोंदिया, कुंता पटले सभापती पंचायत समिती तिरोडा ,मनोज डोंगरे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य, विनोदकुमार चौधरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, खुशाल कटरे उपसरपंच, प्राचार्य नरेश नागदेवे सुभाष महाविद्यालय मालन साठवणे, रेखाबाई पारधी ग्रामपंचायत् स्दस्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे, सुरेंद्र भांडारकर, राजू चामट , साजन दादुरिया जिल्हा समन्वयक, गावातील अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी केले. मंचावर उपस्थित सर्व अतिथी महोदय यांनी सर्व शिक्षिका अंगणवाडी सेविका व किशोरवयीन मुली यांना पोषण महिन्याचे महत्व समजावून सांगितले.
यावेळी सही पोषण – देश रोशन यानुसार पोषण आहार प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पुष्पा भांडारकर मुंडीकोटा बिट यांनी केले कार्यक्रमांमध्ये पोषण पोषण संदर्भात प्रतिज्ञा घेण्यात आली व सर्व अंगणवाडी सेविका,अशा सेविका यांनी संपूर्ण महिनाभर ठरविलेल्या वेळापत्रकानुसार कार्यक्रम घेण्याचा संकल्प केला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुंडीकोटा येथील अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले याबद्द ग्राम् विकास अधिकारी व सरपंच महोदयाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.