संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 30 – कामठी तालुक्यातील भुगर्भाची पातळी खालावली असून उन्हाळ्याच्या सुरवातीला मार्च महिण्यातच सूर्य चांगलीच आग ओकत असल्याने उन्हाळ्याचा प्रकोप चांगलाच वाढला आहे ज्यामुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहे तर येथील कन्हान नदी ही कोरडी पडत चालल्याने नदीचे पाणी हे आटण्याच्या मार्गावर आहे परिणामी कामठी तालुक्यातील मासेमार बांधवांचा व्यवसाय संकटात आला असून मासेमारीवसह डांगरवाडी व्यवसायावर उतरती कळा आलेली आहे.
कन्हान नदी पात्राच्या कडेला असलेल्या कामठी तालुक्यातील नेरी , गादा यासह आदी गावातील भोई समाजबांधव मासेमारीसह डांगरवाडी ची लागवड करतात .कधीकाळी काकडी, टरबूज आणि खरबूज यांच्या वेलांनी संपूर्णपणे झाकोळल्या जाणाऱ्या कन्हान नदीपात्रात आता मात्र अगदीच तुरळक ठिकाणी ‘डांगरवाडी’चे अस्तित्व दिसून येत आहे.उन्हाळ्यात कन्हान नदीचे पाणी वाहने एकदम कमी प्रमानात झाले असून नदी आटण्याच्या मार्गावर आली आहे त्यामुळे भरपूर पाणी लागणारे ,डांगरवाडी’चे पीक घेणे मुश्किल झाले आहे .त्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर लाभदायक ठरणारी ही फळबाग कामठी तालुक्यात शेवटच्या घटका मोजत आहे.काही वर्षांपूर्वी कन्हान नदी पात्रातील डांगरवाड्या चांगल्याच फुलत असत.अवघ्या दोन महिन्यांच्या कष्टात या फळबागा मधून उत्पन्न मिळत असल्याने उत्पादकांची चांगलीच कमाई होत असे.मात्र नदीला पाणी जास्त सोडण्यात आल्याने डांगरवाडी वाहून जाण्याचा धोका तर नदी कोरडी पडल्याने डांगरवाडी नुकसानीचा धोका ..अशा स्थितीत मोठ्या उमेदीने येथील उत्पादक डांगरवाडी ची लागवड करतात.नदीला पाणी कमी झाल्याने लागवड करण्यात आलेल्या फळबाग मधील डांगरवाडी जिवंत ठेवणे कठीण झाले आहे.
डांगरवाड्याच्या रूपाने कन्हान नदीपात्र हे हिरवेगार दिसत असे परंतु डांगरवाड्या आता तुरळक प्रमाणात झाल्याने नदीपात्र आता बकाल दिसू लागले आहे.तसेच कामठी तालुक्यातील डांगरवाड्याची एक संस्कृतीच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.वास्तविकता डांगरवाड्यामुळे उत्पादकांच्या हातात अत्यंत कमी अवधीत पैसा येत असे त्यामुळे ही संस्कृती पुन्हा एकदा भरभराटीस आणण्याची गरज आहे.शेतकऱ्यांना आर्थिक फायदा करून देणाऱ्या डांगरवाड्यासाठी उन्हाळ्यात पेंच प्रकल्पातून नदीत नियमितपणे योग्य पाणी सोडल्यास डांगरवाड्या पुन्हा एकदा बहरू शकतात .
कन्हान नदीच्या तीरावर वसलेल्या गावातील कित्येक नागरिक नदीत मास्यांचे बियाणे सोडून ते मासे मोठे झाल्यावर मोठ्या मासांना पकडून बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात त्यातून त्यांना आर्थिक उत्पादन मिळते ज्यावर कुटुंबाचा उदर्निरवाह चालवितात.तसेच कामठी तालुक्यातील कित्येक तलावांच्या आधारे सुद्धा काही मासेमारी व्यावसायिक मासे पकडण्याच्या व्यवसायातून उदरनिर्वाह करतात मात्र सद्याच्या परिस्थितीत उद्भवलेली सदर स्थितीमुळे हा मासेमारी समाज आजही अपेक्षित जीवन जगत आहे.मात्र शासनाने या समाजाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने या समाजबांधवांचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.या मासेमारी समाजाचा मुख्य व्यवसाय हा निसर्गाच्या प्रकोपाला बळी पडल्याने व या समाजाकडे दुसरी पर्यायी व्यवस्थानसल्याने या समाजाची उपासमार होत आहे.शासनाने तलावांचे खोलिकरण करुण तेथील गाळ उपसन्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. नदी, तलावातिल पानी आटन्याच्या मार्गावर असलयाने माशांची वाढ होत असली तरी मासे जिवंत राहत नाही त्यामुळे मत्स्यव्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे.
येथील मासेमारी समाजाचा मुख्य व्यवसाय मासे पकडने हा असल्याने हे मत्स्यव्यवसायिक कर्ज काढून मत्स्यबीजांची लागवड करतात मात्र यावर्षी नदी तलावात असलेल्या परिस्थितीने मासेचे उत्पादन होत नाही ज्यामुळे मासेमारी व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे . नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासन आर्थिक पॅकेजची घोषणा करून समाधान करते मात्र त्याच धर्तीवर निसर्गाच्या प्रकोपाला बळी पडलेल्या मच्चिमारसाठी आर्थिक पैकेजची घोषणा हवेतच विरविली जाते तेव्हा मासेमारी समाजाचा मासेमरिचा व्यवसाय शासनाच्या उदासिनतेला बळी पड़त असल्याचा आरोप मासेमारी समजाकड़ून होत आहे.