कामठी नगर परिषद ला पडला मान्सूनपूर्व तयारी चा विसर-ऍड अभय गेडाम

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

-शहर स्वच्छतेची कामे पावसाळ्याच्या आधी होणे आवश्यक
-पूर्व नियोजन करण्याची गरज
कामठी ता प्र 17:-पावसाळा तोंडावर आला
असून पावसाळ्यात होणारी नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी पावसळयापूर्वी शहरातील नाले साफ सफाई करून शहर स्वच्छतेची कामे पावसाळ्याच्या आधी होणे आवश्यक असल्याने मान्सूनपूर्व कामे करून पूर्व नियोजन करणे गरजेचे आहे.सध्याच्या वर्तमान स्थितीत कामठी नगर परिषद मध्ये प्रशासक राज सुरू असून राजकीय लोकप्रतिनिधींचा कुठलाही हस्तक्षेप नसून नागरिकांच्या हिताचा प्रशासक नेमलेला आहे,. मात्र कामठी नगर परिषद ला मान्सूनपूर्व तयारीचा विसर पडल्याने शहरातील नाले सफाईचा प्रश्न अजूनही ऐरणीवर आहे असा आरोप तरूण सामाजिक कार्यकर्ता ऍड अभय गेडाम यांनी केला आहे.
कामठी शहरातील मोठमोठ्या नाल्याची दयनीय अवस्था झाली असून त्या मोठ्या नालयामध्ये कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाला असल्याने त्याची स्वछता करण्याची गरज आहे.पावसाळ्याच्या दिवसात स्वछतेच्या अभावी मोठ्या प्रमाणात रोगराई पसरते त्यामुळे शहराची स्वछताची कामे पावसाळ्याच्या आधी होणे आवश्यक आहे परंतु कामठी नगर परिषद तर्फे अद्यापही मान्सूनपूर्व कामाचा देखावा करण्यात आली असून शक्य तिथे नाले सफाई सह खोलीकरण न झाल्याने पावसाळ्यात रोगराईच्या समस्येला शहरवासीयांना तोंड द्यावे लागणार आहे.ज्यामुळे याचा नाहक त्रास होणार आहे त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे तसेच शहरातील नाल्यावर बांधण्यात आलेले अतिक्रमण सुद्धा काढण्यात यावे जेणेकरून नालासफाई होण्यास मदतशील ठरेल. तेव्हा नागरिकांच्या हितातील असलेले प्रशासक कारभार याकडे गांभीर्याने लक्ष पुरवेल अशी अपेक्षा ऍड अभय गेडाम यांनी नागरिकांच्या वतीने केली आहे .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विजय के जरिए महाराष्ट्र में पार्टी बनाने की AAP की कोशिशें

Wed May 18 , 2022
– विधायक जोरगेवार को प्रदेश अध्यक्ष पद का प्रस्ताव   नागपुर- दिल्ली और पंजाब में सरकार बनाने के बाद आम आदमी पार्टी (आप) ने महाराष्ट्र में पैर जमाने का प्रयास शुरू कर दिया है. पूर्व राज्यसभा सदस्य विजय के माध्यम से पार्टी बनाने का प्रयास किया जा रहा है और इसी प्रयास के तहत चंद्रपुर से निर्दलीय विधायक किशोर जोर्गेवार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com