न्यायिक मागण्यासाठी कामठी नगर परिषद कर्मचाऱ्यांचे आज 1 मे पासून बेमुद्दत कामबंद आंदोलन

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 1 :-कामठी नगर परिषद चे सफाई कामगार, पाणीपुरवठा कामगार तसेच सर्व कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दोन दोन महिने वेतन मिळत नसल्याने कर्माचाऱ्यावर होत असलेल्या उपसमारीस कंटाळून तसेच इतर प्रलंबित मागण्यासंदर्भात शासनाचे होणारे दुर्लक्ष व डी एम ए कार्यालयाकडून होत असलेल्या विनाकारण त्रासामुळे कर्मचाऱ्यांच्या न्यायिक हक्काच्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी आज 1 मे ला कामगार दिना च्या दिवशी अत्यावश्यक सेवे सह बेमुद्दत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
आजपासून सुरू झालेल्या या कामबंद आंदोलनात संघटनेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर,उपमुख्य अधिकारी नितीन चव्हाण, कार्याध्यक्ष विजय मेथीयां,प्रदीप भोकरे,अमित खंडेलवाल,वीरेंद्र ढोके, ,आबासा मुंढे,राहुल बोकारे,निखिलेश वाडेकर, विजय सूर्यवंशी, रुपेश जैस्वाल, दर्शन गोंडाने,सचिन बिल्लरवान, दीपक जैस्वाल, धर्मेश जैस्वाल,विजय उज्जैनवार, सारिका परदेसी, अजय करिहार,जमिल अहमद , श्वेता हाडोती, माधुरी घोडेस्वार,अर्पणा, कल्याणी, संजय जैस्वाल, संजीव वाजपेयी, संजय भणारकर,सचिव प्रदीप जैस्वाल तसेच रुपेश जैस्वाल, विजय सूर्यवंशी, विनोद मेहरोलिया, संजय जैस्वाल, दर्शन गोंडाने, पुंडलीक राऊत, मसूद अख्तर, , रणजित माटे , आशिष राऊत, नरेश कलसे, आदि कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवसा निमित्त गरजा महाराष्ट्र माझा कार्यक्रमाचे पत्रक वितरण

Sun May 1 , 2022
संदीप कांबळे, कामठी कन्हान ता प्र 01 –भारतीय जनता पार्टी रामटेक विधानसभा अंतर्गत कन्हान येथील प्रभाग क्रमांक 05 धरम नगर, अशोक नगर, सुरेश नगर, रायनगर कन्हान येथे 1 में महाराष्ट्र दिवस व कामगार दिवसा निमित्त रामटेक विधानसभेचे नेते रामभाऊ दिवटे जिल्हा महामंत्री ओ बी सी आघाडी यांच्या नेतृत्वात आणि डॉ मनोहर पाठक अध्यक्ष भारतीय जनता पार्टी कन्हान शहर यांच्या प्रमुख […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!