– संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 22:- सी पी अँड बेरार च्या काळात छावणी परिषद कामठी च्या वतीने नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहरातील काही जागा बगीचा प्रयोजनार्थ त्याकाळच्या जवळपास 27 नागरिकांना काही हॅकटर प्रमाणे लीज तत्वावर वितरित करण्यात आले होते.ही जागा वितरित करून एक काळ लोटून गेला मात्र त्यांच्या वारसांनी ही जागा आपली वडिलोपार्जित मालकीची जागा असल्याचे गृहीत धरून भाडे तत्वावर असलेल्या बगीचा जागेत काही अजूनही शेती करोत आहेत तर काहींनी शेती कामे बंद करून अकृषक जागेचा देखावा दाखवत ही बगीचा जागा इतर व्यवसायिक कामासाठी उपयोगात आणत आहे तर काहो बगीचे हे नामशेष झाले असून काही ठिकानो रहिवासी क्षेत्र झाल्याचे वास्तव आहे तसेच वितरित करण्यात आलेल्या काही बगीच्यांची लीज मागील दोन वर्षांपूर्वी संपली असून त्या लीज चे नूतनीकरण सुद्धा करण्यात आले नाही तेव्हा अशा स्थितीत लीज वर दिलेली जागा ही शासकीय कामाच्या प्रयोजनार्थ हवी असल्यास त्याच जागेच्या ताब्यासाठी खुद्द प्रशासनाला त्या लीज धारकासमोर रेटे खावे लागत आहेत तर हे लिजधारक स्वतःला बगीचा जागेचा मालक गृहीत धरून गलेलठ्ठ ची भूमिका बजावीत आहेत.ज्याची प्रचिती आज राणी तलाव मोक्षधाम लगतच्या एका बगीच्याच्या जागेच्या मोजणीसाठी तहसील , नगर परिषद, भूमी अभिलेख प्रशासनिक अधिकारि पोलीस ताफ्यासोबत गेले असता नाईलाजास्तव त्यांना उलटपायो परत यावे लागल्याची वास्तविक घटना आज दुपारी 12 दरम्यान घडली.
कामठी च्या महसूल विभागातून प्राप्त माहितीनुसार सी पी अँड बेरार च्या काळात छावणी परिषद कामठी च्या वतीने 27 च्या जवळपास नागरिकांना बगीचा प्रयोजनार्थ लीज तत्वावर जागा देण्यात आली होती .वास्तविकता जागा लिज वर मिळाली म्हणजे जागेचा मालकी हक्क मिळाला असे होत नाही कारण लीज वर दिलेली जागा ही शासकीय कामाच्या प्रयोजनार्थ उपयोगाची असल्यास शासन लिजवर दिलेली जागेचा ताबा हा केव्हाही घेऊ शकते यानुसार कामठी शहरातील बगीचा प्रयोजनार्थ जागा वितरित केलेल्या 27 लोकांमध्ये काटी ओली , कोळसाटाल, भाजी मंडी, दाल ओली, अजनो, छावणी, , जुनी खलाशी लाईन, छावणी, दुर्गा चौक, आजनी इतवारी, गुजरी बाजार,लाला ओली, मोदी पडावं, जुनी भाजी मंडी , संजय नगर , जुनी भाजी मंडी चा रहिवासी नागरिकांचा समावेश आहे. तर यातील 20 च्या जवळपास नागरिकांच्या जागेची लिज संपून दोन वर्षे चा कालावधी संपल्याची माहितो आहे .तसेच यातील कित्येक नागरिकांच्या बगीचा हे नामशेष झाले असून त्या ठिकाणी बगीच्याची जागा इतर प्रयोजनार्थ उपयोगात आहे .यावर प्रशासनाने दुर्लक्ष करून निद्रिस्त भूमिका बजावत आहे याकडे संबंधित प्रशासनिक अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवावे अशी मागणो जोर धरत आहे.
कामठी शहरातील लिजवर वितरित करण्यात आलेले बगीचे झाले नामशेष!
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com