– संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 27:-ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ,थोर कवी व नाटककार वि.वा.शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ च्या वतीने कामठी बसस्थानक येथे मराठी भाषा गौरवदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
या दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार सुरेश अढाऊ , माजी सरपंच इंदलसिंग यादव तसेच कामठी नगर पालिकेचे कर्मचारी प्रदीप भोकरे यांच्या शुभ हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करीत प्रवाशांना प्रातिनिधिक स्वरूपात गोड मिठाई चे पाकीट व गुलाबपुष्प देत मराठी गौरव दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच उपस्थित मान्यवरांनी कवी कुसुमाग्रज यांच्या जीवनावर मौलिक मार्गदर्शन करीत मराठी भाषा संवर्धनावर भर दिला .याप्रसंगी प्रामुख्याने कामठी बस बसस्थानक वाहतूक नियंत्रक जी जी दर्शनवार यांनी सुद्धा कर्यक्रमाच्या संचालनातुन मराठी भाषेच्या संवर्धनावर उपस्थित प्रवाशी व विद्यार्थी वर्गाला मौलिक असे मार्गदर्शन केले.याप्रसंगी कृष्णा पटेल, नागसेन गजभिये, कुंदन मेश्राम, प्रदीप साखरकर, नगरसेवक मो अक्रम, सलीम भाई, अनिल पाटील, तुषार बोंबाटे,सागर नखाते, शोभीत कांबळे, देवा कांबळे आदी उपस्थित होते