नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना – आर. विमला जिल्हा उद्योग केंद्राची नव उद्योजक कार्यशाळा

नागपूर  : नवउद्योजकांना बोलते करा, मनात जिद्द व हिंमत असली तर कोणत्याही क्षेत्रात प्रगती शक्य आहे. नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात महिलांचे सबळीकरण करण्यासाठी महिला नवउद्योजक समोर आल्या आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सुध्दा त्यांनी जिद्द व हिंमतीच्या जोरावर अनेक उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवले असून समस्यांना सामोरे जावून उद्योग जगतात आपला ठसा उमटविला आहे, असे गौरोदगार त्यांनी काढले.
आजादी का अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातील नव उद्योजकांच्या कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनात करण्यात आले. त्यावेळी त्याबोलत होत्या. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस.एस. मुद्दलवार, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक मोहन गेडाम, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक भोनेश्वर शिवनकर, युनियन बँकेचे व्यवस्थापक श्री. गोंडाने, जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी श्री. वानखेडे उपस्थित होते.
नवउद्योजकांनी स्वत:ला आत्मनिर्भर करतांना अनेक बेरोजगारांना रोजगाराची साथ दिली आहे. लघुउद्योगाच्या सहाय्याने महिला प्रगतीपथावर पोहचु शकते, हे त्यांनी सिध्द केले आहे. रमशा जानी या होतकरु युवतीने उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवून शेतील टेक्नॉलाजीची जोड देवून फळांना कसे सुरक्षित ठेवावे यांची सोय करुन दिली आहे. त्यासाठी स्वत:ही टेक्नोसावी व्हा, असा सल्ला जिल्हाधिकारी यांनी दिला.
पेट्रोल, डिझेलचे वाढते भाव व त्यासोबतच होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ई-रिक्षा उद्योगाकडे वळा. नागपूर ग्रीन सिटीला प्रदुषणापासून सुरक्षित ठेवून पर्यावरणपूरक ई-रिक्षा उद्योगात सामिल व्हा. ई-रिक्षा लायसंन्स मुक्त आहे असून एकदा चार्जिंग केल्यास अंशी कि.मी पर्यंत प्रवास करता येतो. या कार्यशाळेत अनेक महिला व पुरुष नवउद्योजकांना आपल्या यशोगाथा सांगितल्या आहेत. त्यापासून प्रेरित होऊन आपणही दुसऱ्यांना प्रेरित करा. महिला उद्योजकांना पुरुषांनी सहकार्य केल्या त्या अधिक जोमाने या क्षेत्रात प्रगती करतील. त्यांना अपेक्षित ती मदत करा, असेही त्यांनी सांगितले. बँकांनी प्रलंबित कर्ज प्रकरणांचा लवकरात लवकर निपटारा करुन उद्योजकांनी मदतीचा हात द्यावा.
प्रारंभी सोया मिल्क-सोया पनीर उद्योगाबाबत माहिती देतांना नवउद्योजक कल्पना सहारे यांनी सोयाबीन पासून अनेक प्राडक्ट तयार करता येतात. तसेच त्याच्या सेवनाने शरीरात प्रोटीनचे प्रमाण वाढून व्यक्ती आरोगदायी जीवन जगू शकतात. सेवानिवृत्तीनंतरही या उद्योगात त्यांचे पती त्यांना मदत करुन उद्योगाची उभारणी योग्य रितीने करतात, असे मनोगत व्यक्त केले.
उमरेड एमआयडीसी क्षेत्रातील नवउद्योजक नागपूर अगरबत्ती क्लबच्या संचालक सिमा मेश्राम यांनी उद्योग सुरु करण्यासाठी आलेल्या समस्या तसेच उद्योगास लागणारा कच्चा माल याबाबत विस्तृत माहिती दिली.
विजय चौधरी यांनी ई-रिक्षाबाबत माहिती देतांना कर्जाअभावी उद्योग उभारणी कशी केली याबाबत मनोगत व्यक्त केले.
बनवाडी येथील रमशा जानी यांनी फ्रुट प्रोसेसिंग युनिटबाबत माहिती देतांना शेतीपुरक टेक्नॉलाजीमुळे शेतकऱ्यांनी शेतातील फळांना जास्तीत जास्त दिवस टिकवून ठेवून ते खराब न होण्याबाबत मनोगत व्यक्त केले. बायोटेक्नॉलाजीमुळे रुमच्या तापमानात फळांना जास्तीत जास्त काळ कसे सुरक्षित ठेवता येते याबाबत माहिती दिली.
यावेळी जिल्हाधिकारी आर विमला यांनी प्रत्येक नवउद्योजकास त्यांच्या क्षेत्रातील व बँकासंबंधी तसेच इतर समस्याबाबत प्रश्नरुपाने विचारणा करुन बोलते केले. तसेच उद्योजक मासिक त्यांना भेट दिले.
प्रास्ताविकात जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. मुद्दलवार यांनी या कार्यशाळातील नवउद्योजकांच्या यशोगाथाच्या मदतीने अनेकांना प्रेरणा मिळून उद्योग क्षेत्रात पदार्पण करु शकतात, असे सांगितले. जिल्ह्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा 332 लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. त्यांनी बँकेद्वारे सबसिडी देण्यात येत आहे. लघु उद्यागामुळे स्वत: सक्षम होऊन अनेकांना रोजगार देवू शकतो. सतत वाढणाऱ्या बेरोजगारीच्या समस्येवर तोडगा शोधू शकतो. तसेच उद्योगाच्या प्रवासात व पुढच्या वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले. या कार्यशाळेस मोठया प्रमाणावर नवउद्योजक उपस्थित होते.
00000

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

बीमाकर्मीयो ने प्रदर्शन किया ; बॅंक हडताल को समर्थन

Fri Dec 17 , 2021
नागपूर : भारतीय जीवन बिमा निगम कि प्रमुख संघठन नागपूर डिवीजनल एल आय सी एम्पलाईज यूनियन ने आज बॅंक कर्मचारीयों कि  दो दिवसीय हडताल को समर्थन देते हुये जीवन बिमा मुख्यालय के सामने जोरदार प्रदर्शन किया. सभा को संबोधित करते हुये अखिल भारतीय जीवन बिमा कर्मचारी असोसिएशन के उपाध्यक्ष काॅ अनिल ढोकपांडे ने केंद्र सरकार कि आर्थिक व मजदूर  विरोधी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com