नागपूर – भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांचे बुधवारी तामिळनाडूमधील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. या अपघातात त्यांच्या पत्नीसह आणखी 12 जणांना जीव गमवावा लागला. या हाद्स्यामुळे भारतीय सेनेची व देशाची फार मोठी न भरून निघणारी हानी झाली आहे. आज व्हेरायटी चौक येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर आम आदमी पार्टी कडून शहीद झालेले जनरल बिपीन रावत, त्यांच्या धर्मपत्नी आणि इतर सहकारी यांना कॅण्डल लावून आणि दोन मिनिट मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी श्री जगजीत सिंग – राज्य कोषाध्यक्ष , डॉ देवेंद्र वानखडे – विदर्भ संयोजक, कविता सिंगल – शहर संयोजक, शंकर इंगोले – संगठन मंत्री, रोशन डोंगरे – उत्तर संयोजक, आकाश कावळे – पश्चिम संयोजक, सुरेंद्र समुंद्रे – दक्षिण संयोजक, शालिनी अरोरा, प्रभात अग्रवाल- मध्य संगठन मंत्री, गुणवंत सोमकुवर – उत्तर सचिव, कृतल आखरे – मध्ये प्रभारी, संजय सिंघ- पश्चिम सहसंयोजक, पुष्पा डाबरे महिला सहसंयोजक दक्षिण पश्चिम, संजय जीवतोडे- जिल्हा श सचिव, पियुश आखरे -विदर्भ युवा संयोजक, सुरेश खर्चे – सचिव दक्षिण पश्चिम, हेमंत बनसोड, अमोल डोहाकर, जॉय बांगडकर, संजू पवार, अरविंद वानखडे, नंदकिशोर श्रीवास्तव, केवळ धाबर्डे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com