भारतीय जनता युवा मोर्चा‘तर्फे छत्रपती शिवाजी महारांजाना अभिवादन

-चंद्रनगरात एक दिवसीय आरोग्य शिबिर व औषध वाटपाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर – नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाजयुमोचे शहर उपाध्यक्ष भूपेंद्र (गोलू) बोरकर यांच्या नेतृत्वात सकाळी महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळयाला माल्यापर्ण करण्यात आले. यावेळी शिवरांयाचा जयघोष करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर रामेश्वरी प्रभागातील भाजयुमोच्या जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन तसेच भाजयुमो व इंडियाना पॅथेलाॅजी लॅबच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराला उद्घाटक म्हणून भाजयुमोचे शहर उपाध्यक्ष भूपेंद्र (गोलू) बोरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. निलेश सरोजकर व डॉ- श्रीकांत खापर्डे  यांची उपस्थिती होती. चंद्रनगरातील संघमित्रा शाळेच्या बाजुला आयोजित या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, थाॅयराईड, हृदय रोग, रक्तगट चाचणी व औषध वाटपाचा लाभ रामेश्वरी प्रभागातील नागरिकांनी घेतला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी रामेश्वरी प्रभाग-33 चे अध्यक्ष मोहन टोंग, रामेश्वरी प्रभाग-33 महामंत्री नरेश चव्हाण, रामेश्वरी प्रभाग-33 उपाध्यक्ष मंगेश गाखरे, अरविंद पाटील, आकाश आगुलवार, पंकज जोशी, गणेश ठाकूर, सुमित मानकर, यश  चौधरी, राजेश चाळीस गावकर व रमेश रेवतकर यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

समर्पण फाऊंडेशन सावनेर तर्फे तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन

Sat Feb 19 , 2022
-दिनेश दमाहे सावनेर – सावनेरात आज 164 स्पर्धकांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त समर्पण फाऊंडेशननी आयोजित तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत नोंदणी केली. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. जगदीश कोकाटे साहेब, प्रमुख दिवाणी न्यायाधीश, सावनेर ह्यांच्या मंगल हस्ताने झाले. त्यांनी सर्व मुलांनी शिवाजी महाराजांच्या चरित्रा पासून तसेच प्रमुख वक्ते  संजय भेलकर सर व प्रा. प्रथमेश देशपांडे ह्यांनी सर्व स्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com