नागपूर – दक्षिण नागपूर येथील रिंग रोड आशिर्वाद नगर येथील बिडीपेठ प्रभागात क्र. ३० मध्ये अनेक समस्या आहेत. पण त्या समस्याकडे आपले व आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. म्हणून आपण त्या सर्व समस्या चे स्वतः निराकरण करण्यात यावे. आशिर्वाद नगर मध्ये खुप ठिकाणी गडरचे झाकण नाही आहे. तसेच काही ठिकाणी झाकण आहे पण ते तुटलेले आहेत. रस्त्यावरिल इलेक्ट्रीकची लाईन आहे. त्यायामध्ये रस्त्यावरील वाढलेले झाडे इलेक्ट्रीक तारात घुसलेले आहेत. त्यामुळे पावसात लाईन जाने, स्पार्क होणे तसेच जिवित हानी होण्याची शक्यता आहे. प्रभागात खुप ठिकाणी कचऱ्याची समस्या आहेत. काही रस्त्यावर १५ ते २० दिवस साफ -सफाई होत नाहीत. काही ठिकाणी जी महानगर पालिकेची जागा आहे तेथे अतिक्रमण करुन कबाडीचा धंदा केला जात आहे आणि कबाडीचा माल तिथेच साठवून ठेवला जातो. तसेच गार्डनमध्ये सापा-सफाई नाही त्याची देखरेख नाही. लहान मुलांचे खेळणे, तुटलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे लहान मुलांना दुखापत झाली आहे तसेच गार्डन मध्ये सेक्युरिटी गार्ड नसल्यामुळे तेथील गुंडे प्रवृत्तीचे मुल येतात. आणि दारु गांजा तसेच जेष्ठानी समजल्यावर जेष्ठ नागरिकाना शिवीगाळ केली जाते. म्हणून प्रभाग ३० मधील गार्डन मध्ये एखादा गार्ड असावा. प्रभागातील रस्त्यावर मोठ-मोठ खड्डे असल्यामुळे पावसाळ्यात खडयात पाणी भरते व अपघात खुप मोठया प्रमाणात होतो. त्यामुळे प्रभागातील रस्त्याचे खड्डे बुजवावे व चांगले रस्ते बनवावेत. अश्या अनेक समस्या या प्रभागात आहे आपणास विनंती आहे की आपण या सर्व समस्यावर स्वतः लक्ष दयावे. जनतेच्या या समस्याचे समाधान करुन दयावे अशी विनंती शिवसेना प्रणीत महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनचे नागपूर शहर अध्यक्ष सिद्धूजी कोमजवार यांनी एका पत्रकात केली आहे त्यावेळी राजु भाऊ लांबट, योगेश आंग्रे, पंकज नेवारे, अक्षय चौधरी, अरुण अवजे, मंगेश चट्टे, गजानन कोकुडे,राम पलेरीया इत्यादी उपस्थित होते.
प्रभाग क्र. ३० मध्ये अनेक समस्या ? ? त्याकडे मनपाचे दुर्लक्ष..
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com