नागपूरमध्ये एकाच दिवशी १४ बाधिताचा मृत्यू

-पालकमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता; काळजी घेण्याचे आवाहन

नागपूर दि.२७: नागपूरमध्ये २७ जानेवारीला एकाच दिवशी कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 14 वर पोहोचली आहे. यामध्ये एकट्या नागपूर शहरातील दहा मृतांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले आहे .
या संदर्भात रात्री उशिरा जारी केलेल्या निवेदनात त्यांनी नागपूर, विदर्भात पुढील काही दिवस थंडीची लाट सर्दी,पडसा, ताप अशीच साथ राहण्याचे चिन्ह आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणेने देखील या संदर्भात सूतोवाच केले असून नागरिकांनी स्वयंशिस्तीत कोरोना पासून स्वतःचा बचाव करण्याचे म्हटले आहे. पुढील काही दिवस थंडी देखील राहणार आहे . यामुळे शहरात रुग्ण संख्या वाढण्याचे संकेत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून नागपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या चार ते पाच हजाराच्या घरात आहे. त्यामुळे नागपूरातील रुग्णवाढीचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. अशा वेळी नागरिकांनी कोरोना प्रोटोकॉल पाळावा. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, तसेच पुढील काही दिवस शक्य असेल तर घरातच राहावे, उनी कपड्यांचा वापर करावा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे .तज्ञ डॉक्टरांच्या टास्कफोर्सद्वारे येणाऱ्या सूचनांकडे प्रशासनाचे लक्ष असून चाचण्या वाढवणे, लसीकरणाला गती देणें आणि बेपर्वा लोकांवर दंडात्मक कारवाई करणे सुरू असल्याचेही त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले . नागरिकांनी या काळात प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

NCP  के शहर उपाध्यक्ष राजा बेग द्वारा हज़रत बाबा ताजुद्दीन (र.अ.) के जन्मदिवस पर विविध कार्यक्रम का आयोजन

Fri Jan 28 , 2022
नागपुर – २७ जनवरी हजरत बाबा ताजुद्दीन (र.अ.) जन्म दिवस पर NCP  के शहर उपाध्यक्ष राजा बेग द्वारा केक काटकर लोगों में बांटा गया इसके बाद आम लोगों के लिए गोंडवाना चौक बैरामजी टाउन पर पुलाव का भंडारा (लंगर) आयोजन किया गया था । हजरत बाबा ताजुद्दीन (र.अ.) जन्मदिवस के शुभ अवसर पर राजा बेग द्वारा सदर में जगह-जगह पर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!