नागपूर जिल्ह्यामध्ये ‘आरंभ ‘ बालसंगोपन प्रशिक्षणाची सुरुवात

-0 ते 3 वयोगटातील मुलांच्या महत्तम वाढीसाठी शास्त्रीय उपक्रम

नागपूर  : मातृत्व, पितृत्व स्वीकारायचे असेल तर जन्माला येणाऱ्या बाळाबद्दलची जबाबदारी समजून घेणे आवश्यक असते. कारण शून्य ते तीन वयोगटातच बालकाचा भावनिक, शारीरिक, बौद्धीक विकास होत असतो नागपूर जिल्ह्यातील अशा शून्य ते तीन वयोगटातील मुलांच्या महत्तम वाढीसाठी आरंभ नावाचा उपक्रम सुरू झाला आहे.
बालवयात संस्कार याबाबतचे महत्व सर्व धर्मशास्त्रामध्ये नमूद आहे. मात्र बाळाचा जन्म उत्सव म्हणून साजरा करणारी संस्कृती त्याच्या बालवयातच त्यातही शून्य ते तीन वयोगटातच आवश्यक काळजी घेत नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे बालकाच्या उत्तम बौद्धिक विकास होण्यासाठी भावनिक दृष्ट्या तो सक्षम होण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने आपले कर्तव्य बजावावे यासाठीचे नियम जबाबदारी, यासोबतच तांत्रिक सल्ला देण्याचे काम या उपक्रमात केले जाणार आहे.
“आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे”, नागपूर जिल्हा परिषद महीला बाल कल्याण विभागा अंतर्गत नुकतेच आरंभ प्रशिक्षण 27.01.2022ते 30.01.2022पर्यंत चार दिवशीय आयोजित केले होते. हे प्रशिक्षण एकात्मिक बालविकास कौशल्य पर्यवेक्षिका, गावागावातील सेविका, आशा वर्कर, आशा गटप्रवर्तक यांना देण्यात येणार आहे. हे आरंभ प्रशिक्षण महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था सेवा ग्राम आणि युनिसेफ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.सुबोध गुप्ता प्राचार्य प्रकल्प इंन्वेस्टीगेटर यांच्या आरंभ रिसर्च अभ्यासक्रमातून 0 ते 3 वर्ष वयोगटातील बालकांसाठी असून हे वय बालकांचे अत्यंत महत्त्वाचे आहे. या वयातच बालकांची वाढ आणि विकास यातील फरक समजावून सांगितले आहे. आरंभ प्रशिक्षणामध्ये बालकांचे सुरवातीचे क्षण किती मोलाचे आहे. बालकांना खेळणी नको, खेळ हवा. पालक आणि सामाजिक परिसरातील सर्व सदस्य यांच्या सक्रिय सहभागाने प्रशिक्षणातून आरंभ गावातील सामान्यातील सामान्य परिवाराला कळेल, असे मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेषत: यात पालक आणि आजी, आजोबा यांचा महत्वाचा सक्रिय सहभाग कृतीशिल राहणार आहे. बालकांची वाढ आणि विकास यातील फरक संवेदनशील पालकत्व, प्रतिसादात्मक कुटुंबाचा सहभाग खेळ, संवाद, कृती या माध्यमातून बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा. तसेच सुरक्षित वातावरण, आहार आरोग्य व स्वच्छता यावर प्रशिक्षण देण्यात आले. बालकांची प्रगती बघीतली तर वाढ ही मोजता येते. आणि विकास हा निरंतर राहणार आहे. हा विकास वयाच्या शेवटच्या वयापर्यंत आणि शिक्षणा पालकांना बघायला दिसणार आहे.
हे या आरंभ प्रशिक्षणाचा महत्वाचा गाभा आहे. यामध्ये पालकांनी मुलांना खेळ आणि वेळ देण्याची गरज का आहे हे जर समजले आरंभच्या माध्यमातून तर पालकांना पुढे पश्चात्ताप करण्याची वेळच येणार नाही. वयोगटानुसार मेंदुला चालना देणारे खेळ व संवाद कृती, संवेदनशिल पालकत्व, भौतीक आणि कौटुंबिक, सुरक्षित वातावरण.. आरोग्य विषयक संदेश, विशेष गरजा असणारी बालके हेसुद्धा वेगळे नसून त्यांनाही ईतर बालकाप्रमाणे कुटुंबाचा सहभाग वाढावा. या साठी सुद्धा आरंभ घराघरात काम करणार. आवश्यकतेनुसार आहार. गृहभेटी मध्ये घरातील सर्वांचा सहभाग. आणि पालक सभा, पालक मेळावा हे आरंभ प्रशिक्षण चा महत्वाचा भाग आहे.
जिल्हा परिषदेमध्ये नुकतेच या प्रशिक्षणाचा समारोप झाला. या समारोप प्रसंगी उपस्थित मुख्यकार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिव्यांग बालकांचे सुरुवातीपासून निदान होण्याच्या दृष्टीकोनातून लक्ष ठेवण्यासाठी पालक व पर्यवेक्षिकांना आवाहन केले. उपमुख्यकार्यपालन अधिकारी भागवंत तांबे, आरंभ टिमचे जिल्हा संपर्क अधिकारी अतुल कातरकर, जिल्हा संपर्क अधिकारी सम्राट खंडार, राज बसेकर यांची यावेळी उपस्थिती होती. ज्यांनी अत्यंत कृती शिल, संवेदनशील प्रशिक्षण दिले अशा मास्टर ट्रेनर संगिता चंद्रिकापुरे, सिमा धुर्वे, मनिषा भुरचंडी, ज्योती रोहणकर, चित्रा घडे आणि सर्व प्रशिक्षणार्थी पर्यवेक्षिका यांच्यामार्फत हे प्रशिक्षण आता गावागावात पोहचणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगिता चंद्रिकापुरे यांनी केले तर आभार रंजना कांबळे यांनल मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

बजट 2022 पर महाराष्ट्र सरकार के पूर्व कैबिनेट मंत्री डॉ अनीस अहमद की प्रतिक्रिया।

Thu Feb 3 , 2022
– बजट 2022 ने दर्शाया अच्छे दिन आम आदमी के लिए बहुत दूर हैं। नागपुर – पूर्व कैबिनेट मंत्री डॉ. अनीस अहमद ने भाजपा सरकार, वित्त मंत्री निर्मला सीतारमण और नरेंद्र मोदी पर केंद्रीय बजट में उनके लिए कोई राहत उपायों की घोषणा नहीं करके देश के वेतनभोगी और मध्यम वर्ग के साथ विश्वासघात करने का आरोप लगाया। आम आदमी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!