कामठी तालुक्यात मुलांपेक्षा मुली सरस

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

तालुक्याचा निकाल ९८.२४ टक्के, ३१ विद्यालयाने गाठली शंभरी

९० टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त करणा-या विद्याथ्र्यांचे 

कामठी,ता.१७: विद्याथ्र्याच्या षिक्षणाची पहिली पायरी समजली जाणारी महाराश्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत एप्रिल २०२२ ला घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेमध्ये कामठी तालुक्याचा निकाल ९८.२४ टक्के लागला असून तालुक्यात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारल्याने मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या आहेत. तालुक्यातील तब्बल ३१ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
 कोरोना महामारीच्या पाष्र्वभूमीवर यंदा राज्य मंडळाच्या परीक्षा होम सेटरवरच घेण्यात आल्या होत्या. कामठी तालुक्यातील ४९ षाळांमधून १३९९ मुले व १२८६ मुली असे एकूण २६८५ विघार्थी परिक्षेला बसले होते त्यापैकी १३६४ मुले (९७.४९) व १२७४ मुली(९९.०६) एकूण २६३८ विघार्थी (९८.२४) उत्तीर्ण झाले. या परिक्षेमध्ये तालुक्यातील ९३९ विद्यार्थी प्राविण्य श्रेणी, ११९४ विद्यार्थी प्रथम श्रेणी तर ४५४ विद्यार्थी द्धितीय श्रेणीत तर केवळ ५१ विद्यार्थी तालुक्यातील कामठीच्या सेंट जोसेफ काॅन्हवेंट हायस्कुल, सरस्वती शिशु मंदीर, रामकृष्ण शारदा मिशन गर्ल्स हायस्कूल, सेठ रामनाथ लोईया हायस्कुल कामठी,शिक्षक सहकारी माध्यमिक षाळा, सेवानंद विद्यालय महादुला, भांगे पब्लिक स्कुल कोराडी, आदर्ष विद्यालय गुमथळा (गुमथी), सेठ रामनाथ लोईया हायस्कुल कामठी, प्रियांती इंग्लिष स्कुल तरोडी (बु), गुरूकुल पब्लिक स्कुल वडोदा, रामकृष्ण शारदा मिशन गर्ल्स हायस्कूल, देषभक्त रत्नप्पा कुंभार विद्यालय, इंदिरा हायस्कुल, अष्विनी माध्यमिक विद्यालय बिना, पद्मश्री स्मिता पाटील कन्या विद्यालय महादुला, अविनाश हायस्कूल, विवेकानंद विद्यालय पळसाड, टेमसना माध्यमिक विद्यालय, टेमसना, राजीव विद्यालय जाखेगाव, शासकिय अनुसुचित जाती नवबौध्द निवासी आश्रमषाळा वारेगाव, स्वं. राजीव गांधी हायस्कुल सुरादेवी, पांडुरंग गवते विद्यालय भिलगाव, अॅड. दादासाहेब कुंभारे माध्यमिक विद्यालय खसाळा,मास्टर नूर मोहम्मद, ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय पावनगाव, अनुसूचित जाती नवबौध्द मुलांची शासकीय शाळा वारेगाव, इंडियन आॅलंपियाड स्कुल भिलगाव, इडियाल कॉन्व्हेन्ट गुमथळा, एम एन एम ब्राईट इंग्लिश स्कूल येरखेडा, तायवाडे पब्लिक स्कूल कोराडी, सनराईज कॉन्व्हेन्ट स्कूल महादुला, टर्निंग पॉईंट पब्लिक स्कूल खेडी, विद्या मंदीर हाय कोराडी या शाळेचा निकाल शंभर टक्के तर तालुक्यातील कामठीच्या हाजीयानी खतीजाबाई गर्ल्स हायस्कुल (९८.९१), नूतन सरस्वती गर्ल्स हायस्कूल(९७.८०), एम.एम. रब्बानी क.म. (९४.७९), नूतन सरस्वती बाॅईज हायस्कुल.(९७.५०), सेठ कल्लनमियाॅ अंसारी हायस्कुल (९३.४३), दीपच्छाया माध्यमिक निवासी आश्रम शाळा चिखली (८५.७१), हरदास हायस्कुल (९७.४३), प्रागतिक माध्य.विद्यालय (९७.९८), तेजस्विनी माध्यमिक विद्यालय(९८.७९), भोसला मिलीटरी स्कुल पंचवटी(९९.१०), अॅड. दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी (८८.२३), प्रकाष हायस्कुल गुमथळा (९६.५१), ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय पावनगाव, अॅड. दादासाहेब कुंभारे माध्यमिक विद्यालय खसाळा, गांधी विद्यालय वडोदा (९७.८७), श्रीनाथ विद्यालय महालगाव (८१.२५), स्नेही विकास विद्यालय भुगाव (९६.८२) असा निकाल आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठीत कांग्रेसचा मशाल प्रदर्शन

Fri Jun 17 , 2022
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 17:-काँग्रेस अध्यक्षा .सोनियाजी गांधी व नेते खा.राहुलजी गांधी यांच्यावर खोटे आरोप करत त्यांच्यामागे ईडी च्या चौकशी लावून त्यांची मुस्कटदाबी करु पाहणाऱ्या मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात आज सायंकाळी 6 वाजता कामठी येथील कांग्रेस कमिटी कार्यलयात मशाल प्रदर्शन करीत मोदी सरकार विरोधात नारेबाजी करण्यात आले. या मशाल प्रदर्शन आंदोलनात कांग्रेस शहराध्यक्ष कृष्णा यादव, युवक कांग्रेस चे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com