व्यावसांयीकांच्या मालमत्ता रामभरोसे
केळवद – येथिल मुख्य बाजार पेठेतील ता.१४ ला मध्यराञी एक नव्हे तर चक्क चार दुकानांची शटर फोडुन लाखो रुपयांची रौख सह ,सीसीटीव्ही कॅमेर्याची डी.व्ही.आर मशीन आणी दुकानातील कीराणा साहीत्यवर हाथ साफ केला,येथिल पोलीस स्टेशनच्या हाकेवर असणार्या येथिल बाजार पेठेतील चक्क चार दुकाने चोरटयानी फोडल्याने,केळवद पोलीस राञीला कीती सर्तक आणी कर्तव्यनिष्ट असते हे घडलेल्या प्रकरणातुन पहावयास मिळत आहे,
केळवद पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार येथिल बाजार चौकातील मुख्य रस्त्यांनवरील ओमप्रकाश ढोबळे यांच्या कीराणा दुकानातुन नगदी रुपये ६६,८१०,सीसीटीव्ही कॅमेर्याची डी.व्ही.आर,मशीन कीमंत १५००० रुपये,दुकानातील काजु बदाम सह इतर साहीत्य,असा ८३,८१० रुपयाचा ऐवज चोरटयांनी चारुन नेला,तर लगतच्या सुधाकर बांगरे यांच्या बांगरे ज्वेलर्स चे शटर तोडुन,सीसीटीव्ही कॅमेर्याची डी.व्ही.आर मशिन कीमंत १५००० हजार रुपये,चोरटयांनी चोरुन नेले ,तर रुपेश तळेकर यांच्या राहत्या घरी असलेल्या असलेल्या कीराणा दुकानातुन ३५ हजार रुपये नगदी चोरुन नेले ,तसेच सुधाकर उईके यांच्या दुकानातुन ७५० रुपये चोरले,सर्व चारही दुकानांचे शटर तोडुन आत प्रवेश करीत दुकानातील रौख रक्कम आणी साहीत्य चोरुन नेले,गावात स्थानिक पोलीस स्टेशन असतांना आणी राञकालीन पोलीसांची गस्त असतांना चोरटयांनी केळवद पोलीसांच्या डोळ्यात अंजन घालत,चक्क चार दुकाने फोडल्याने,गावातील व्यावसांयीकांची मालमत्ता राम भरोसे काय ?असा सवाल निर्माण होत आहे,ज्या स्थानिक ठीकाणी पोलीस स्टेशन आहे ,त्याच ठीकाणी चक्क चार दुकाने ऐकाचवेळी फोडले जात असेल,तर या पोलीस स्टेशन अंतर्गत असणार्या ४६ गावाची अवस्था सुरक्षेच्या दुष्टीने काय असेल,हा विचार न केलेलाच बरा हे या चोरी सञावरुन दिसुन येते,घटणास्थळी सावनेरचे उप विभागीय पोलीस अधिकारी अशोक सबंलकर,सह श्वान पथक,सायबर पथक यांनी भेट देत तपास केला,सदर घटणेचा तपास येथिल ठाणेदार राहुल सोनवणे,पोलीस उप निरीक्षक नासरे,पोलीस शिपाई रवि चटप,गुणवंत डाखोळे करीत आहे.
याच पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या खुरजगाव येथे ता.१४ लाच मीराबाई गणेश आवारी रा.खुरजगाव ह्या घरी नसतांना घराचे दार तोडुन,घरातील आलमारी फोडुन पंधरा हजार रुपये चोरुन नेले.
येथिल सर्व दुकानदारांची बैठक घेवुन , चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे तसेच कॅमेरे सुरक्षित ठीकाणी लावावे ,जणेकरुन चोरटे तोडणार नाही,या संर्दभात सुचना दिल्या जाईल,ग्रामसुरक्षा दलाचे सैनिक अथवा गुरखा राञकालिन गस्तासाठी नेमण्याचे आवाहण आम्ही येथिल दुकानदारांना केलेले आहे. जणेकरुण अश्या घटणा घडु नये,राञकालिन गस्तात वाढ करुन लवकरच चोरटयांना ताब्यात घेतले जाईल त्या दिशेने आमचा तपास सुरु आहे.राहुल सोनावणे
ठाणेदार,पोलीस स्टेशन ,केळवद.
मंदार अरविंद बावनकर,
केळवद