दिल्लीच्या सहकार्याने शिवसेनेला संपवण्याचे राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी केले – नवाब मलिक

मुंबई दि. २४ जानेवारी – दिल्लीच्या सहकार्याने देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना संपवण्याचे राजकारण केले मात्र आता त्यांना शिवसेना काय आहे हे समजू लागल्याने अशाप्रकारची विधाने ते करत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.
पाच वर्षाचा निकाल पाहिला तर भाजपमुळे शिवसेनेचे खच्चीकरण झाले आहे. उध्दव ठाकरे यांनी २५ वर्ष युतीत सडलो असे विधान केले आहे. मात्र आता शिवसेनेची ताकद वाढताना दिसत आहे. आता जे नगरपालिकांचे निकाल आले त्यावरुन भाजपसोबत राहिल्याने कमकुवत झालेल्या शिवसेनेचा ग्राफ कितीतरी पटीने वाढलेला दिसला असेही नवाब मलिक म्हणाले.
बाळासाहेबांनी युतीचा निर्णय घेतला होता शिवाय हयातीत युतीतून बाहेर पडण्याचा विचारही केला होता. आम्ही कॉंग्रेससोबत असताना सेनेकडून राष्ट्रवादी सोबत आली पाहिजे हा प्रस्ताव होता परंतु काही कारणामुळे जमले नाही असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
२०१९ च्या आधीपासून भाजपसोबत खच्चीकरण होतेय ही चर्चा सुरू होती. भाजप ज्या पक्षांसोबत युती करतो त्यांचे खच्चीकरण करतो हे सेनेला अगोदरच कळले होते त्यामुळे सेनेने भूमिका घेऊन भाजपला बाजूला केले असेही नवाब मलिक म्हणाले.
सेनेसोबत असताना भाजप मोठी झाली हे आता देवेंद्र फडणवीस यांना समजले आहे परंतु आठ वर्षापासून देवेंद्र फडणवीस सेनेला संपवण्याचे राजकारण करत होते असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

विदर्भ में जल्द से जल्द स्कूल, काॅलेज व शैक्षणिक संस्थान शुरू करें  सरकार: अश्विन प्रकाश अग्रवाल

Mon Jan 24 , 2022
सरकार महाराष्ट्र में वैवाहिक मंगल कार्यालय शुरू कर 200 लोगों की अनुमति दे: एन.वी.वी.सी. नागपुर – विदर्भ के 13 लाख व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था नाग विदर्भ चेंबर ऑफ  काॅमर्स के अध्यक्ष श्री अश्विन प्रकाश अग्रवाल (मेहाड़िया) के साथ चेंबर के पदाधिकारियो ने महाराष्ट्र राज्य की महिला व बाल विकास मंत्री श्रीमती यशोमतीजी ठाकुर से नागपुर में सदिच्छा भेंट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!