चंद्रपूर महानगरपालिकेत वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

चंद्रपूर  – हरितक्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेत साजरी करण्यात आली. उपायुक्त अशोक गराटे तसेच मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक, प्रगतिशील शेतकरी, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जयंतीदिन संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. वसंतराव नाईक यांना राज्याच्या कृषी क्रांतीचे आधारस्तंभ मानले जाते. याप्रसंगी विधी अधिकारी अनिल घुले, सारंग निर्मळे,विकास दानव,गुरुदास नवले,विलास बेले, माधवी दाणी, पुणेकर,  मनोज सोनकुसरे,चॅनल वाकडे तसेच मनपा अधिकारी कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विरोधी पक्षाचे काम नक्कीच चांगले करू आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास जिंकू - जयंत पाटील

Sat Jul 2 , 2022
मुंबई  – आता आम्ही विरोधी पक्षात बसलो आहोत तर विरोधी पक्षाचे काम नक्कीच चांगले करू आणि महाराष्ट्रातील जनतेचा पुन्हा एकदा विश्वास जिंकू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे प्रदेश कार्यालयात आले त्यावेळी माध्यमांशी बोलताना वरील माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार साहेबांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!