-खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखा जाहीर
-२ ते १६ जानेवारी दरम्यान नागपूरात क्रीडा महोत्सव:एकूण ३६ खेळ
-४१ मैदाने ४२ हजार खेळाडू
-१ कोटी ३ लाख ७५ हजार रुपयांचे पारितोषिक
नागपुर : खासदार क्रीडा महोत्सवाचे हे चौथे वर्ष असून नागपूर शहरातील हजारो खेळाडू उत्साहात यात सहभाग नोंदवतात.त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून दर वर्षी विविध खेळातील आयकॉन आम्ही या महोत्सवाच्या उद् घाटनासाठी बोलवतो,आयकॉन खेळाडू हे नागपूरकर खेळाडूंसाठी प्रेरणादायी असून क्रीकेटचा महान बल्लेबाज सचिन तेंदूलकर यांच्या हस्ते या महोत्सवाचा शुभारंभ झाला असल्याचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.ते सुरेश भट सभागृहात खासदार क्रीडा महोत्सवाच्या कॉफी टेबल बूकच्या विमोचनाप्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी मंचावर अर्जुन पुरस्कार विजेता व बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा,भारतीय हॉकी चमूचे कप्तान व खेळ मंत्री हरियाणाचे संदीप सिंह,क्रीडा महोत्सवाचे संयोजक व माजी महापौर संदीप जोशी,खासदार डॉ.विकास महात्मे,आमदार मोहन मते,आ.कृष्णा खोपडे,आ.विकास कुंभारे,आ.प्रवीण दटके आदी उपस्थित होते.याप्रसंगी गडकरी यांच्या हस्ते खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या.२ ते १६ जानेवरी दरम्यान हा क्रीडा महोत्सव पार पडणार आहे.
याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले,की खासदार क्रीडा महोत्सवामध्ये खेळ विश्वातील आयकॉन डोळ्या पुढे असल्यास त्यांच्यासारखे बनण्याची प्रेरणा स्पर्धकांना मिळते.स्पर्धेशिवाय कोणी मोठा होत नसतो.उत्तम ते सर्वोत्तम बनण्यासाठी स्पर्धा महत्वाची आहे.या जगात काेणीही परिपूर्ण नाही,सगळे अपूर्णांक असतात मात्र खेळाप्रति निष्ठा असणाराच खरा खेळाडू असतो.
मी लहान असताना मला ही खेळायला आवडत असे मात्र त्या काळी सुविधांचा अभाव होता.चांगली मैदाने नव्हती,स्पर्धा नव्हत्या,साधने नव्हती.नागपूरात प्रतिभेची कमतरता नाही मात्र त्या प्रतिभांना पुढे येण्यासाठी क्रीडा साहित्य,मैदाने उपलब्ध करुन देने गरजेचे आहे.
असाच प्रयत्न देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व चंद्रशेखर बावणकुळे हे पालकमंत्री असताना झाला.आ.कृष्णा खोपडे,आ.रविंद्र कुंभारे,आ.मोहन मते यांच्या मतदारसंघात अशी मैदोन खेळाडूंना उपलब्ध करुन देण्यात आली.आज नागपूरातील सर्व भागात ३५० खेळाची मैदाने आहेत.लवकरच त्या मैदानांवर पाण्याची फव्वारणी करण्यासाठी सिवेज पाण्याचे जे पुर्ननिर्माण केले जाते त्या पाण्याचा उपयोग केला जाईल.याशिवाय या मैदांनावर नि:शुल्क विज,शौचालये,चेंजिंग रुम इ.सुविधा देखील निर्माण केल्या जात आहे.मी स्वत: लवकरच या सर्व मैदानांची पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
नागपूरमधून ज्वाला गुट्टा किवा संदीप सिंह यांच्यासारखे खेळाडू तयार व्हावे,ज्यांनी नागपूर व देशाचे नाव उज्जवल करावे अशी माझी ईच्छा आहे.याच क्रीडा महोत्सवात फक्त खेळाडूंच्या प्रतिभेलाच वाव मिळत नाही तर ज्येष्ठ महिलांची देखील स्पर्धा यशवंत स्टेडियममध्ये भरवण्यात आली होती.त्यांनी देखील या वयात ही खेळाचा निखळ आनंद लृटला.
या वेळी तर १५ दिवसात ३६ स्पर्धा पार पडणार आहेत.या स्पर्धा खेळाडू आणि त्यांच्या संघांना उत्साहित करणा-या असतात.मात्र करोनामुळे दोन वर्ष हा आनंद मिळवता आला नाही याचं दू:खं आहे.काल खासदार सांस्कृतिक महोत्सवात ३० ते ४० हजार नागपूरकर हे सुखविंदर सिंह यांच्या गाण्यावर नाचले,दोन वर्षांच्या कालावधी नंतर नागपूरकरांच्या चेह-यावर हास्य फूलले.
पालकांनी जास्तीत जास्त प्रमाणात खेळांमध्ये सहभाग घेण्यात आपल्या पाल्यांना प्रोत्साहित करावं,खेळाडू आणि पालक यांच्या देखील चेह-यावर या क्रीडा महोत्सवामुळे अानंद फूलेल याची खात्री आहे,असे गडकरी म्हणाले.हा फक्त स्पर्धकांचा नसून पालक,भावंडे,शेजारी,नातेवाईक अश्या सर्वांचा महोत्सव असल्याचे त्यांनी सांगितले.
मला विशेष आनंद होत आहे हा क्रीडा महोत्सव सुरु होत असून या स्पर्धांमधून नागपूर व देशाचे नाव उज्जवल करणारे खेळाडू देशाला गवसतील.याप्रसंगी खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजन करणारे माजी महापौर संदीप जोशी यांच्या परिश्रमाचे गडकरी यांनी विशेष कौतूक केले.
प्रास्ताविकेत बोलताना संदीप जोशी यांनी खासदार क्रीडा महोत्सवाची सुरवात ४ वर्षांपूर्वी झाली असल्याचे सांगितले मात्र दोन वर्षे करोनामुळे यात खंड पडला.आज आपल्या शहरामध्ये या महोत्सवाच्या उद् घाटनाला अर्जून पुरस्कार विजेता ज्वाला गुट्टा व भारतीय हॉकी चमूचे कप्तान व खेळ राज्यमंत्री हरियाणाचे संदीप सिंह उपस्थित असून या खेळाडूंनी कठोर संघर्षातून हे यश प्राप्त केल्याचे त्यांनी सांगितले.
संदीप सिंह यांना तर कंबरेत व पाठीवर बंदूकीच्या गोळ्या लागल्या मात्र तरीही त्यातून सावरत पाकिस्तानच्या विरोधात गोल करण्यात ते अग्रेसर होते.कालच एशियन हॉकी स्पर्धेत आपण पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवल्याचे कौतूक त्यांनी केले.ज्वाला यांचा जन्म वर्धा येथील असून नागपूरच्या माऊंट कार्मेल शाळेत त्यांचे शिक्षण झाले आहे.सावरकर नगर येथे त्यांचे वास्तव्य होते.आज त्यांनी आपल्या खेळातून देशात वेगळे स्थान निर्माण केल्याचे व विदर्भाचे नाव उज्जव केल्याचे संदीप जोशी म्हणाले.
याप्रसंगी क्रीडा महोत्सवाची माहिती देताना महोत्सवात १५ दिवसात ३६ खेळ पार पडतील,गेल्यावेळी २८ स्पर्धा पार पडल्या होत्या यावेळी त्यात ८ खेळांची भर पडल्याची त्यांनी सांगितले.४१ ठिकाणी या स्पर्धा पार पडणार असून ५६० चषके दिली जाणार आहेत.७ हजार ८३० मॅडेल दिली जातील.४२ हजार खेळाडू भाग घेणार असून १ कोटी ३ लाख ७५ हजार रुपयांची राशी वितरीत केली जाणार आहे.
दर वेळी हा महोत्सव नागपूरात उत्साहात पार पडतो मात्र एकच खेदाची बाब असते ती म्हणजे खेळाडू मैदानात असतो पालक घरी असतात. यावेळी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूरकरांनी मैदान गाठावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी दिव्यांगा,मतिमंद,मुक बधिर,पार्शली अंध यांच्या देखील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.
याप्रसंगी बोलताना ज्वाला गुट्टा यांनी असे क्रीडा महोत्सव प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात झाले पाहीजे असे मत व्यक्त केले.नागपूरकरांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा अश्या शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
संदीप सिंह यांनी, मी अगदी पहिली वेळ आहे नागपूरात आलो असे सांगून हरियाणा ही तर खेळाडूंची फॅक्टरी असल्याचे सांगितले.हे राज्य ऑलंपिकमध्ये सुवर्ण पटकावणा-या खेळाडूला ६ कोटी,रजत साठी ४ कोटी,तांब्याच्या पदकासाठी अडीच कोटी तर चौथा क्रमांक गाठणा-याला देखील ५० लाख रुपये बक्षीस देते.गडकरी यांनी देखील एका दिवसात हजारो किलोमीटर रस्ते निर्माण करण्याचा रेकॉर्ड बनवला आहे.तुम्ही खूप भाग्यशाली आहात तुम्हाला असे खासदार मिळाले आहेत जे खेळांना इतके प्रोत्साहन देतात.
या महोत्सावतून देशातील भावी ऑलंपिक विजेते खेळाडू घडतील,यावेळी आपल्या देशाने ७ पदके पटकावली,अश्या स्पर्धा आयोजित होत राहील्यास ७ पासून ७० पदके होण्यास वेळ लागणार नाही,असे त्यांनी सांगितले.
चांगले खेळाडू म्हणून घडायचे असल्यास अंगी तीन गोष्टी अंगिकारा असा सल्ला त्यांनी दिली.पहीली शिस्त,दुसरी आपले पालक,कोच,शिक्षक यांचा सन्मान ठेवा व तिसरी कधीही खोटे बोलू नका की तुम्ही खेळाचा सराव केला म्हणून.या तीन गोष्टी पाळल्यास तुम्हाला महान खेळाडू होण्यावाचून कोणीही थांबवू शकणार नाही.
येत्या ५ फेब्रुवारी पासून हरियाणात ‘खेलाे इंडिया’ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून खासदार क्रीडा महोत्सावतील विजेत्यांनी त्या स्पर्धेत देखील सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले.तुम्ही असे खेळाडू म्हणून घडा की तुमचे नाव एखाद्या गल्ली,चौकाला दिले जाईल आणि तुमच्या पालकांना तुमच्यावर गर्व होईल असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी राज्यस्तरीय बास्केटबॉल विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सूत्र संचालन आर.जे.मोना यांनी केले.आभार पियुष आंबुलकर यांनी मानले.