संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून केले अभिवादन
कामठी ता प्र 14:-विश्वरत्न ,विश्वभूषण, भारतरत्न, महाविद्वाण, महानायक,अर्थशास्त्री,क्रांतीसूर्य, युगपुरुष, महामानव ,बोधिसत्व,परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पुज्यनोय भिक्षु संघाच्या उपस्थितित विशेष बुद्ध वंदना घेण्यात आली. सुरुवातीला उपस्थित पूज्य भन्तेजी व ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर मेणबत्ती व अगरबत्ती लावण्यात आली.तसेच सभागृहाच्या मध्यभागी ठेवण्यात आलेल्या परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे मोठ्या प्रमाणात उपस्थित धम्मसेवक व धम्मसेवकांनी विशेष बुद्ध वंदनाच्या माध्यमातून परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली.या विशेष बुद्ध वंदनेत कामठी विधानसभेचे आमदार टेकचंद सावरकर,अजय कदम,दीपक सीरिया,अफजल अन्सारी,अश्फाक कुरेशी,नारायण नितनवरे, दिपंकर गणवीर,उदास बन्सोड,यशवंत गजभिये,सुभाष सोमकुवर,चंदू लांजेवार,मनीष डोंगरे,अनुभव पाटील,रेखा भावे,रजनी लिंगायत,सुकेशनी मुरारकर,वंदना आळे, शालू सावतकर,सुमन घरडे,शशिकला मेश्राम,वंदना कांबळे,सुरेक्षा भोंडेकर,सुनील वानखेडे,राजेश गजभिये,भैय्यालाल भोयर,अजित बागडे,राजेश शंभरकर,चंदू कापसे,भीमराव आळे,सुरज मेश्राम,सचिन नेवारे,नरेंद्र बावनकुळे,सागर भावे,सुशिल तायडे,आकाश भीमटे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
-ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथील परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे व कामठी विधांनसभाचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या शुभ हस्ते माल्यार्पण करून अभिवादन वाहण्यात आले.याप्रसंगी उपस्थित असलेले ड्रॅगन पॅलेस टेम्पल,डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संशोधन केंद्र ,ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर,हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था,हरदास विद्यालय,ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल,दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी,दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र ,बहुजन रिपब्लिकन एकता मंच,इत्यादी संस्थेचे पदाधिकारी,कर्मचारी,शिक्षकवृंद यांनी सुदधा परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.
यावेळी ड्रॅगन पॅलेस इंटरनॅशनल स्कुल च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राच्या वतीने प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सुदधा देण्यात आले.कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता गणेश सेंगर,विनोद जुंमडे,देवेंद्र जगताप,अंबरीन फातिमा,मेघा स्वामी,सेजल मानवटकर,दिलीप बोबडे,संजय सुके,मनोज तातोडे,मोतीराम वंजारी,रोशन वंजारी,अरविंद वंजारी,प्रवीण राऊत,अशोक नगरारे,इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.