कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 8 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता  

मुंबई : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबामुंबई यांनी वर्तविली आहे.

उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच दि. 5 जुलै रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात 30-40 किलोमीटर प्रतीतास वेगाने वादळ वारा व विजेच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस तर दि. 6 व 7 जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मच्छीमारांनीही पुढील चार दिवस महाराष्ट्र – गोवा सागरी किनाऱ्यावर जावू नयेअशा सूचना प्रादेशिक हवामान विभागाने दिल्या आहेत. 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आपले घर डेंग्युमुक्त ठेवा

Tue Jul 5 , 2022
आताच काळजी घेतली तर धोका टळेल मनपा प्रा.आरोग्य केंद्रात मिळणार गप्पी मासे   चंद्रपूर  – डेंग्यु व इतर कीटकजन्य आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत घरोघरी केल्या जाणाऱ्या कंटेनर सर्वेमध्ये ४७०० घरांमध्ये डासांची अंडी आढळली आहेत. त्यामुळे आताच काळजी  घेऊन आपले घर डेंग्युमुक्त ठेवण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे   करण्यात येत आहेत. मनपा आरोग्य विभागामार्फत एमपीडब्लू, एनएम व आशा वर्करद्वारा डासअळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!