अमरदिप बडगे, प्रतिनिधी
पुजारी टोला धरणाचे चार गेट उघडण्यात आले ;गोंदियाला हवामान खात्याचा येलो अलर्ट
गोंदिया – जिल्ह्यात आज दुपारी पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर काल रात्री सुद्धा पाऊस सुरु असल्याने पुजारी टोला या धरणाचे चार गेट ०.३० मी नि सुरु करण्यात आले. असुन त्या मधून ९३.२२ क्यूमेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
तर नागरिकांना नदी काठा जवळ जाऊ नये तसेच नदी नाले ओलांडू नये असे सतर्क तेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पाऊस असुर असल्यास धरणाचे पाणी अधिक सोडण्यात येण्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्हाला हवामान खात्याचा येलो अलर्ट मिळाला असल्याने पावसाची उघड़ झाप सुरुच आहे.