चंद्रपूर : जीवन जगताना प्रत्येकवेळी आरोग्य महत्त्वाचे आहे. आरोग्य व्यवस्थित नसेल तर आयुष्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छता लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियानांतर्गत आयोजित विविध स्पर्धांचे पुरस्कार वितरण एका छोटेखानी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, सभागृह नेता देवानंद वाढई, झोन सभापती छबू वैरागडे, सहायक आयुक्त विद्या पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी महापौर म्हणाल्या, महात्मा गांधींनी “स्वच्छ भारत” चे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी स्वच्छ भारत अभियानची सुरवात केली. स्वच्छता म्हणजे केवळ पुरस्कार मिळविण्यासाठी न राहता ते स्वतःसह आणि समाजाच्या आरोग्यसाठी एक चळवळ होण्याची गरज आहे. चंद्रपूर शहर सुंदर आणि स्वच्छ होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापौरांनी केले.
स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियानांतर्गत इम्पॅक्ट ऑफ स्वच्छ भारत मिशन कॉम्पिटिशनचे आयोजन केले होते. यामध्ये चंद्रपूर शहरातील विविध क्षेत्रात आपले महत्वाचे योगदान देणार्या एकूण 25 नागरिकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी बेस्ट 5 जणांना उत्कृष्ट पुरस्कार देण्यात आहेत. यामध्ये आरोग्य क्षेत्रातून डॉ. स्नेहल पोटदुखे, स्किल डेव्हलपमेंट एज्यूकेशन मधून नागेश नित, योगा प्रशिक्षक मधून स्मिता रेबनकर, होम कंपोस्टिंग अवरेनेससाठी सुवर्णा लोखंडे, ट्री प्लांटेशन अँड मेडिकल कॅम्पसाठी डॉ. सिराज खान यांचा समावेश आहे.
आयडेंटिफिकेशन अंड रेकॉग्निशन ऑफ चॅम्पियन्स या स्पर्धेत स्वच्छता कर्मचारी, वार्ड नगरसेवक, सीएसआर लीड, एन जी ओ प्रतिनिधी यांचा सहभाग होता. स्पर्धेत पाच पुरुष आणि पाच महिला गटातून पुरस्कार देण्यात आले. पुरुष गटातून संतोष गर्गेललवार, सुभाष कासनगोटूवार, देवानंद साखरकर, विवेक पोतनुरणार, महेंद्र राडे यांचा समावेश आहे. महिला गटातून छबुताई वैरागडे, रोशनी तपासे, मोनिका जैन, शारदा हुसे, वर्षा आत्राम यांना देण्यात येईल.