स्वस्थ बालक बालिका स्पर्धा

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 21:- स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव अंतर्गत महाराष्ट्र शासन महिला व बाल कल्याण विभागा मार्फत कुपोषित, कमी वजनाच्या बालकांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात मिशन स्वस्थ बालक अंतर्गत स्वस्थ बालक बालिका स्पर्धा आज .21 मार्च पासून राबाविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या अंगणवाडीमध्ये मिशन स्वास्थ बालक अंतर्गत स्वस्थ बालक बालिका स्पर्धा आयोजित करण्यात आली . त्यां अनुषंगाने कामठी तालुक्यातील येरखेडा येथील भूषण नगर अंगणवाडीमध्ये स्वस्थ बालक बालिका स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेची सुरवात कामठी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी अंशुजा गराटे यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी येरखेडा ग्रामपंचायतच्या सरपंच मंगला कारेमोरे, सहाय्यक गट विकास अधिकारी तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी . प्रदीप गायगोले, आरोग्य विस्तार अधिकारी . मनिष दिघाडे, सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका, सदर अंगणवाडीच्या अंगणवाडी सेविका तथा बालकांचे पालक प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सेठ केसरिमल पोरवाल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय शिबिराचे घोरपड येथे उद्घाटन सोहळा संपन्न

Mon Mar 21 , 2022
संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 21:-कामठी शहरातील सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय शिबिराचे घोरपड येथे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र बागडे अध्यक्ष स्थानी तर पंचायत समिती कामठीचे सभापती उमेश रडके आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अनीलजी निदान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. घोरपड गावच्या प्रथम नागरिक व सरपंच सौ ताराबाई कडू, महाविद्यालयाचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com