संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 17:- दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हनुमान जयंती निमित्त निघणारी शोभायात्रा यशस्वीरीत्या पार पडावी तसेच शोभयात्रेदरम्यान शांतता व सुव्यवस्था कायम राहावे यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आव्हान करीत आज दिनांक 17 एप्रिल ला दुपारी 13:45 ते 14:30 वाजेदरम्यान कडकडत्या उन्हात जुनी व नवीन कामठी पोलिसांनी रूट मार्च काढला.
हे रूट मार्च नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 चे पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया , सहाय्यक पोलीस आयुक्त नयन आलूरकर व जुनी कामठी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे व नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आले . सदर रुट मार्च पोलीस स्टेशन जुनी कामठी येथून सुरू होऊन हनुमान जयंती शोभायात्रा चे प्रमुख मार्ग हैदरी चौक, दुर्गा चौक, जयस्तंभ चौक, यादव नगर, जयभीम चौक, कळमना टी पॉईंट, शुक्रवारी बाजार, गोयल चौक, गुजरी चौक, जामा मस्जिद, गुड ओली चौक, फुल ओली चौक, बोरकर चौक होऊन पोलीस स्टेशन जुनी कामठी येथे समाप्त करण्यात आला.
सदर रूट मार्च मध्ये डीसीपी मनीष कलवानिया, एसीपी नयन आलूरकर, वपोनी जुनी कामठी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे व नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यासह ,4 पोउपनीरिक्षक, 28 कर्मचारी, 1 एसआरपीएफ पथक ,1 आरसीपी पथक व 45 होमगार्ड चा समावेश होता याप्रसंगी रूट मार्च शांततेने पार पडला.