नागपूर, १२ एप्रिल २०२२ : नागपूर सुधार प्रन्यास द्वारे ऑनलाइन अर्ज भरण्याकरीता या आधी विविध वर्तमानपत्रात -जाहीराती देण्यात आल्या होत्या. ज्या अर्जदाराने आपली अनधिकृत भुखंडके व बांधकामे नियमीत करण्याकरीता ऑनलाईन अर्ज केले आहे. नियमीतीकरणाकरीता आपल्या अश्या अर्जदाराने आपल्या भुखडकाच्या मालकी हक्काच्या दस्ताऐवजासह विभागीय कार्यालय पूर्व पश्चिम / उत्तर दक्षिण या पैकी ज्या क्षेत्राअंतर्गत आपला भुखंड येत असेल त्या विभागीय
कार्यालयात आवश्यक कागदपत्र जमा करून पोच पावती घ्यावी.
आवश्यक कागदपत्रांची तपशील खालील प्रमाणे आहे. २) भुखंडकाचे विकीपत्र
(२) अभिन्यास नकाशा
३) विद्यमान बांधकामाचा नकाशा
(४) वास्तुवीशादर यांचाकडून तयार केलेला भुखंडाचा नकाशा मौक्यावर उपलब्धतेनुसार
५) हमीपत्र
६) भुखंडावर कोणतेही न्यायालयीत प्रकरण नसल्याबाबतचे प्रतीज्ञापत्र
७) क्षतीपूर्तीबंध
सदर आवश्यक कागदपत्र स्विकारण्याची विशेष मोहीम दि. १५/०४/२०२२ व दि. १६/०४/२०२२ या दोन दिवसात घेण्यात येणार आहे. सदर दोन दिवस शासकीय सुट्टी असली तरी सुट्टीच्या दिवशी यासाठी विभागीय कार्यालय उघडी राहणार आहे, तरी ज्यांनी ऑनलाईन अर्ज केले असतील अशा अर्जदारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मनोजकुमार सुर्यवंशी, सभापती, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर यांनी केले आहे.