ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही -पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांची ग्वाही

भंडारा : स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या मार्फत ग्रामीण भागातील विकास योजना राबविल्या जातात. ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासक प्रतिपादन पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी आज केले.

आज “हीरक महोत्सव समारंभ” जि. प. भंडाराचे सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्या स्थापनेस 60 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने “हीरक महोत्सव समारंभ” कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री कदम यांनी केले. यावेळी लाल बहादुर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थीनीने सांस्कृतिक गित व नृत्य सादर केले.

            या कार्यक्रमाला नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य, माजी पदाधिकारी तसेच जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. एस. मुन, अति. मु. का. अ. दिपक चौधरी, उप मु.का.अ.(सा) डॉ. सचिन पानझाडे उप मु.का.अ.(पंचा) किरण कोवे तसेच इतर अधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

'रशियन हाऊस इन मुंबई'च्या संचालिका यांची विधान भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट.

Mon May 2 , 2022
मुंबई – डॉ.एलिना रेमिझोव्हा यांनी सभापती आणि उपसभापती यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्र दिनानिमित्त आणि कामगार दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतांना त्यांनी मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग या प्रमुख दोन शहरांमध्ये झालेल्या सिस्टर सिटी कराराला या वर्षीं ५५ वर्षे पूर्ण होत असल्याचे सांगून त्यानिमित्त आजपर्यंतच्या वाटचालीला उजाळा दिला. महाराष्ट्र दिनानिमित्त दिलेल्या संदेशात सभापती महोदयांनी भारत-रशिया मैत्रीपूर्ण संबंधाच्या गौरवशाली परंपरेचा आवर्जून उल्लेख […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!