राज्यपालांच्या हस्ते रतन टाटा यांना मानद डॉक्टरेट प्रदान

रतन टाटा विनम्रता, मानवता व नितिमूल्ये जपणारे श्रेष्ठ व्यक्तीरा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई  : नव्याने स्थापन झालेल्या एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या पहिल्या विशेष दीक्षांत समारोहात ज्येष्ठ उद्योगपती व टाटा समूहाचे अध्वर्यु रतन टाटा यांना मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी प्रदान करण्यात आली. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे रतन टाटा यांना ही पदवी सन्मानपूर्वक बहाल करण्यात आली.

            राज्यपाल कोश्यारी म्हणाले,रतन टाटा हे केवळ उद्योगपती किंवा कॉर्पोरेट जगताचे प्रमुखच नाहीत तर ते त्याहीपेक्षा विनम्रता, मानवता व नितिमूल्ये जपणारे श्रेष्ठ व्यक्ती असून नव्या उद्योजकांसाठी दीपस्तंभ आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी केले.रतन टाटा यांनी मानद पदवी स्वीकारुन विद्यापीठाचा तसेच उपस्थितांचा गौरव वाढवला. टाटा यांचा सन्मान हा संपूर्ण टाटा समूहाचा तसेच टाटा घराण्याचा सन्मान असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

विद्यापीठांनी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी : रतन टाटा

            एचएसएनसी समूह विद्यापीठ ही एक दूरदर्शी संकल्पना असून विद्यापीठांनी  नीतिमत्ता व मानवी मूल्ये यांच्या वाटेने देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी अशी अपेक्षा रतन टाटा यांनी यावेळी व्यक्त केली.

            दीक्षांत समारोहाला विद्यापीठाचे मुख्य संरक्षक डॉ. निरंजन हिरानंदानी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, एचएसएनसी बोर्डाचे अध्यक्ष अनिल हरीश, माजी अध्यक्ष किशु मानसुखानी व कुलगुरु डॉ हेमलता बागला आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Governor Koshyari confers Honorary Doctorate on Ratan Tata

Sun Jun 12 , 2022
Mumbai  :Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Honorary Doctor of Literature to industrialist and philanthropist Ratan Tata at Raj Bhavan Mumbai on Saturday (10th Jun).             The Honorary doctorate was presented to Tata at the First Special Convocation of the HSNC University. Provost of the HSNC University Dr Niranjan Hiranandani, president of HSNC Board Anil Harish, former President Kishu Mansukhani, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!