कन्हान- होळी च्या पावन पर्वा हनुमान मंदिर चौक टेकाडी येथे दरवर्षी प्रमाणे गरदेव बाबा महोत्सव मोठया उत्साहने शांततेत साजरा करण्यात आला.
पुरातन शेकडो वर्षाची गरदेव बाबा महोत्सव ही परंपरा ची सुरूवात ढोल नगाडया च्या तालत पुजा अर्चना करून भक्तानी प्रत्येकांनी क्रमाक्रमाने गरदेव बाबा च्या भोवती फिरून वंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता मारोती बोरघरे, रामचंद्र राउत, पंढरी बाळबुधे, मनोज लेकुरवाले, जनार्दन सातपैसे, अंबादा स सातपैसे, सचिन भोयर, गंगाधर आकोटकर, आनंद गजभिये, पंकज राउत आदीनी सहकार्य केले.