– लवकरच गड्डीगोदाम येथे रेल्वे ट्रॅकच्या वर ७०० टन गर्डरचे लॉन्चिंग
नागपूर : महा मेट्रो द्वारे निर्माणाधीन कामठी मार्गावरील गड्डीगोदाम, गुरुद्वारा या ठिकाणी चार मजली पुलाचे कार्य युद्धस्तरावर सुरु असून लवकरच गड्डीगोदाम(गुरुद्वारा जवळ)रेल्वे ट्रॅकच्या वर ७०० टन गर्डरचे लॉन्चिंग महा मेट्रो द्वारे केल्या जाणार आहे. सदर गर्डर लॉन्चिंगकरण्याकरिता ४.३० तासांचा ब्लॉक घेतल्या जाणार आहे.
आतापर्यंत १६०० टन लोखंडी स्ट्रकचर पैकी ७०० टनाचे कार्य पूर्ण झाले आहेत. आव्हानात्मक असे हे कार्य २४ तास महा मेट्रोच्या चमू द्वारे केल्या जात आहे. महा मेट्रोने रेल्वेला निर्माण कार्याकरिता एकूण २४ तासांचा ब्लॉक मागितला आहे.
७०० टन वजनच्या गर्डरला रेल्वे ट्रॅकच्या वर लॉंच करण्याकरिता रेल्वे प्रशासनाकडून ४.३० तासांचा ब्लॉक घेण्यात जाणार असून या संपूर्ण पुलाच्या गर्डरचे एकूण वजन १६४० टन आहे. गर्डर लॉन्चिंग नंतर क्रांक्रीटचे कार्य केल्या जाईल त्या नंतर रेल्वे रुळ व ओएचईचे कार्य केल्या जाईल.
९.०७ मीटरचे ८ स्पेन ३ पैनल मध्ये असेम्बलिंग केले जाईल जे की ८० मीटर राहील. आता पर्यंत ८ तासाचा ब्लॉक महा मेट्रोने घेतल्या गेला आहे.
या लोखंडी स्ट्रकचरचे प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे :
• स्ट्रकचरची जमिनीपासून उंची २४ मीटर,लांबी ८० मीटर व रुंदी १८ मीटर आहे.
• एकूण वजन १ हजार ६३४ टन
• स्ट्रकचर उभारणी करतांना सुमारे ७८००० एएसएफजी (हाईट स्ट्रेंथ फ्रिक्शन ग्रीप) बोल्टचा उपयोग करण्यात आला.
या ठिकाणी देशात पहिल्यांदाच वेगळ्या पद्धतीची संरचना असलेल्या चार स्तरीय बांधकाम केल्या जात आहे. सदर निर्माण कार्य अतिशय कठीण आणि मुख्य म्हणजे सतत व्यस्त अश्या रेल्वे लाईन गड्डीगोदाम येथील आरयुबी(RuB) येथे करण्यात येत आहे. गड्डीगोदाम क्रॉसिंग येथील संरचनेत ४ स्तरीय परिवहन व्यवस्था आहे. पहिल्या स्तरावर जमिनी मार्ग (विद्यमान आरयुबी मार्ग) रहदारी करीता असलेला रस्ता, दुसऱ्या स्तरावर रेल्वे ट्रॅक, तिसऱ्या आणि चौथ्या स्तरावर उड्डानपूल आणि मेट्रो मार्गिका राहणार आहे .
प्रस्तावित उड्डानपूल आणि मेट्रो ट्रॅकज्याला ‘राईट ऑफ वे’ म्हणतात. म्हणजे या २ संरचनेचे निर्माण कार्य एका सिंगल पिलर वर होणार आहे. ज्यामुळे किंमत आणि रस्त्यावरील जागेचा कमी उपयोग होईल. उड्डानपूल संरचना एलआयसी चौक येथून सुरु होणार असून आटोमोटीव्ह चौक पर्यत कामठी रोड अश्या व्यस्त मार्गावर आहे.मेट्रो व्हायाडव्टची सर्वात जास्त उंची गड्डी गोदाम येथील गुरुद्वारा जवळ असले ज्याठिकाणी रेल्वेमार्ग रस्त्यावरून जात आहे.