नागपुर – महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त फुल मार्केट सिताबर्डी येथे कामगारांना कामगारांचे साहित्य (फावड़ा, घमेला व टीकास) व गुलाबाचे फुल तसेच नाश्ता देऊन शुभेच्छा देऊन कामगार दिन व महाराष्ट्र दिन नुकताच साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ कामगार सेलचे अध्यक्ष लालसिंग ठाकूर व कामगार सेल चे प्रसिद्धी प्रमुख नागपुर शहर ब्रजेश मिश्रा तसेच नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव बाबूलाल साहू यांनी केले होते. या कार्यक्रमात महिला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे महासचिव सौ.नंदा पराते, उमेश डांगे, नागपूर शहर जिल्हा कांग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष व अध्यक्ष ब्लॉक क्र-8 रजत देशमुख, सौ.संजना देशमुख, नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे -उपाध्यक्ष मनोज घोडमारे, सुरेश सिंग चव्हाण, मनोज उईके, विजय कांबळे, कलावती ताई माहुले, प्रमिला ताई मर्दाने, डॉ.अनिल दक्ष प्रामुख्याने उपस्थित होते.
फुल मार्केट सिताबर्डीत मजूर कामगारांना पावळा, घमेला आणि टीकास भेट देऊन जागतिन कामगार दिवस साजरा.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com