शुक्रवारी जिल्ह्यात 111 कोरोना पॉझिटिव्ह तर 51 रुग्णांना डिस्चार्ज

एकूण डिस्चार्ज 59101

एकूण पॉझिटिव्ह 60628

क्रियाशील रुग्ण 393

आज मृत्यू शून्य

एकूण मृत्यू 1134

रिकव्हरी रेट 97.48 टक्के

मृत्यू दर 01.87

आजच्या टेस्ट 1336

एकूण टेस्ट 496993

भंडारा, दि. 14 :  जिल्ह्यात शुक्रवारी 111 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.14) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 51 आहे. शुक्रवारी 1336 व्यक्तींची चाचणी केली असता 111 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता 393 सक्रिय रुग्ण आहे.

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 59101 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60628 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.48 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 96 हजार 993 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60628 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 52, मोहाडी 08, तुमसर 15, पवनी 05, लाखनी 12, साकोली 09 व लाखांदुर तालुक्यातील 10 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1134 आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

नागरिकांना आवाहन

  • कोरोनावर सध्यातरी लस हाच एकमेव उपाय असून पात्र नागरिकांनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस अवश्य घ्यावी.
  • जे लाभार्थी दुसरा डोस घेण्यासाठी पात्र ठरले आहेत, त्यांनी लसीचा दुसरा डोस प्राधान्याने घ्यावा.
  • कोविड वर्तणूक नियमावलीचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

IndianOil’sSERVO turns 50

Fri Jan 14 , 2022
-SERVO Futura NXT 0W-16, high-performance petrol engine oil for new generation cars launched to mark golden jubilee of India’s homegrown No.1 lubricant brand Mumbai, January 14, 2022:SERVO, India’s most preferred lubricant brand,marked its 50th year since inception on January 12th, 2022. The occasion saw the launch of the BS-VI compliant SERVO Futura NXT 0W-16 lubricant specifically designed for the new-generation […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com