नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. १० डिसेंबर) रोजी १० प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ३६,००० चा दंड वसूल केला. पथकाने ५२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. तसेच पथकाने गांधीबाग झोन येथील ५ पतंग दुकानांनवर कारवाई करुन १३२ पतंगे जब्त केली आणि रु ५०००/- चा दंड केला. तसेच सतरंजीपूरा झोन अंतर्गत एका दुकानामधुन ९० पतंग जब्त करुन रु १०००/- चा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली
शुक्रवारी १० प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई २२२ पतंगे जब्त केली
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com