‘फ्रीडम टू वॉक अँड सायकल’ मोहिमेत सर्वाधिक नोंदणी करण्याचा मान नागपूरला

नागपूर, ता. १८ : केंद्र शासनाच्या गृह निर्माण आणि शहरी विकास मंत्रालयातर्फे आयोजित ‘इंटर-सिटी फ्रीडम टू वॉक अँड सायकल’ मोहीमेअंतर्गत सर्वात जास्त कि.मी. चालणे आणि सायकलिंगसाठी सर्वाधिक नोंदणी करण्याचा मान नागपूर शहराला मिळाला आहे. शहरासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. यासाठी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. आणि स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भूवनेश्वरी एस यांनी सर्व नागपूरकर जनतेचे अभिनंदन करून आभार मानले.

          भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड व नागपूर महानगरपालिकातर्फे नागरिकांनी या मोहिमेत भाग घेऊन जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या निर्देशानुसार सायकलिंग अँड वॉकिंग करिता प्रोत्साहन देण्यासाठी ‘इंटर-सिटी फ्रीडम टू वॉक अँड सायकल मोहीम’ १ ते २६ जानेवारी २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

          या मोहिमेचे उद्देश सायकलिंग आणि चालण्याच्या फायद्यांबद्दल जनजागृती करणे, नागरिकांना त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल आणि वॉकसाठी प्रोत्साहित करणे तसेच शहरातील हरित वाहतुकीला प्रोत्साहन देणे आहे.

          नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे नागरिकांना सायकल आणि पायी चालण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी १ ते २६ जानेवारी २०२२ या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात आली होती, अशी माहिती डॉ. प्रणीता उमरेडकर, महाव्यवस्थापक (प्रभारी) पर्यावरण विभाग, नागपूर स्मार्ट सिटी यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

JAGUAR LAND ROVER ANNOUNCES PARTNERSHIP WITH NVIDIA

Fri Feb 18 , 2022
As part of Jaguar Land Rover’s Reimagine strategy, the partnership will transform the modern luxury experience for customers starting in 2025 Software experts from both companies will jointly develop AI-powered autonomous driving and connected services for all future vehicles built on NVIDIA DRIVE Next-generation safety and unique, brand-focused digital services enabled by NVIDIA AI   Feb. , 2022: Jaguar Land Rover […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com