नागपूर : देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्यानिमित्त जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयामार्फत तयार होणाऱ्या संकलित साहित्य कृतीला माहिती पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सव अभियानांतर्गत, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सैनिकांच्या सन्मानार्थ ‘ नागपूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सेनानींचे स्वातंत्र्य संग्रामातील सहभाग’ याचे दस्ताऐवजीकरण आणि साहित्य निर्मितीचे योजिले आहे. यासाठी विदर्भातल्या सर्व जिल्ह्यातील स्वातंत्र सैनिक व त्यांच्या नातेवाईकांना आवाहन करण्यात येत आहे. यासाठी स्वतंत्र्य सेनानी हयात असल्यास त्यांनी वा त्यांच्या नातेवाईकांनी स्वातंत्रसंग्रामातील त्यांची कामगिरी त्यांचे अनुभव लेखी स्वरुपात फोटोसह जिल्हा महिती कार्यालयास कळवावे वा dionagpur@gmail.com या मेलआडीवर मेल करावा.
यासबंधी जिल्हा महिती कार्यालयाकडून स्वातंत्र्य सैनीकांस स्वतंत्र पत्रव्यवहार करण्यात आला आहे. जिल्हा माहिती कार्यालय,प्रशासकीय भवन क्र.1,तिसरा माळा,सिव्हील लाईन,नागपूर-440001 या पत्यावर उलट टपाली त्याला प्रतिसाद देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आर.विमला यांच्याकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयातील 8380977915, 9604157273 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले आहे
स्वातंत्र सैनिक व त्यांच्या नातेवाईकांना आवाहन ‘स्वातंत्र्य संग्रामातील सहभाग’ या गौरवग्रंथाची निर्मिती
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com