मुलांसाठी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम

नागपूर :   जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत School Based Pit & Fissure Project (स्कुल बेस्ड पीट आणि फिसर प्रोजेक्ट)चा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केला.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये School Based Pit & Fissure Application (स्कुल बेस्ड पीट आणि फिसर अप्लीकेशन)ची गरज असलेल्या मुलांकरिता राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत स्कुल बेस्ड पीट आणि फिसर प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून गरजु मुलांना Sealant Application करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात आज शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर येथे करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. यावेळी शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.दातारकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सेलोकर, डॉ. वैभव कारेमोरे, डॉ.रितेश कळस्कर, डॉ.दानिश इकबाल, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी व NCD चमु आदी उपस्थित होते.

या प्रकल्पाअंतर्गत यावर्षी एकूण 19 जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण 2414 विद्यार्थ्यांची दंत शल्य चिकित्सकांद्वारे तपासणी करण्यात आलेली आहे. यापैकी 615 Sealant Application करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद व शासकीय दंत महाविद्यालय यांचेमध्ये सदर तपासणी व उपचाराकरिता करार करण्यात आलेला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

सामान्य नागरिकांना कोविड सानुग्रह निधी मिळण्यासाठी मदत करा : जिल्हाधिकारी

Thu Dec 16 , 2021
        कोविड मृतकाच्या नातेवाईकांना सेतू केंद्र, ऑनलाईन, क्यूआर कोडची अर्जासाठी उपलब्धता          सोपा अर्ज, तात्काळ प्रतिसाद, महाकोविड 19 रिलीफ डॉट इन संकेतस्थळाचा वापर करा         मध्यस्थांवर करडी नजर, सेतू केंद्रावरील फसवणुकीकडे पोलीसांचे लक्षhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4         अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक चित्रफितीचे लोकार्पणhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.38.56_131274e2.mp4  https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.46.31_6d1c5419.mp4 नागपूर : कोरोना महामारीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या बाधिताच्या नातेवाईकांना 50 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com