‘अग्निशमन सेवा सप्ताह’निमित्त विविध शाळांमध्ये प्रात्यक्षिके व जनजागृती कार्यक्रम

नागपूर, ता. १९ : राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे १४ ते २० एप्रिल दरम्यान ‘अग्निशमन सेवा सप्ताह’ पाळण्यात येत आहे. याअंतर्गत शहरातील नागरिकांमध्ये अग्निशमन विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने मंगळवारी (ता. १९) मनपाच्या सर्व अग्निशमन केंद्रातर्फे शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आले. सोबतच आगीपासून निर्माण होणारे धोखे टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता व उपाययोजना बाबत जनजागृती व अग्निशमन यंत्रणेची माहिती देण्यात आली. या जनजागृती कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिक्षक व विद्यार्थ्यांनी भाग घेऊन स्वतः प्रात्यक्षिके केले.

          मंगळवारी नरेंद्रनगर अग्निशमन केंद्रातर्फे भगवान नगर येथील श्री. साईनाथ विद्यालयात, कॉटन मार्केट अग्निशमन केंद्रातर्फे मिलिंद उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना, लकडगंज अग्निशमन केंद्रातर्फे सी. ए. रोड छाप्रूनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात, गंजीपेठ अग्निशमन केंद्रातर्फे गांधीबाग झोन कार्यालयात, सक्करदरा अग्निशमन केंद्रा तर्फे झोन कार्यालयात नागरिकांना प्राथमिक व स्थायी अग्नीशमन यंत्रणेची माहिती व प्रात्यक्षिके देण्यात आले. याशिवाय त्रिमूर्ती नगर अग्निशमन केंद्र, कळमना अग्निशमन केंद्र, सुगत नगर अग्निशमन केंद्रातर्फे सुद्धा शहरात विविध शाळांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात आली.

          यावर्षी अग्निशमन सेवा दिनाची थीम ‘शिका अग्नी सुरक्षितता, वाढावा उत्पादकता” ही आहे. या सप्ताहात मनपा क्षेत्रात आगीपासून निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता व त्यावरील उपाययोजनांबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

झोपडपट्टी भागात पर्याप्त दाबाने पाण्याची आपूर्ति करा 

Tue Apr 19 , 2022
बैठकीत मनपा आयुक्तांचे निर्देश नागपूर, ता. १९ : शहरातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नागपूर महानगपालिकेद्वारे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात झोपडपट्टी भागात पाण्याची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे अशा भागात पर्याप्त दाबाने पाण्याची आपूर्ति करा. तसेच शहरातील ज्या भागात पाणी टंचाई आहे अशा भागात टँकरने पाणी पुरवठा करा, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी. यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.  मंगळवारी (ता. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!