माहीम येथील बनावट विदेशी मद्याचा कारखाना उद्ध्वस्त

 मुंबईदि.२६ :  कासा कोरोलीनाबिल्डींग फ्लॉट नं.१तळ मजलामोरी रोडसोनावाला फायर टेम्पल समोरमाहिम मुंबई येथे छापा घातला असता या ठिकाणी परदेशातून आयात झालेल्या विविध मद्याच्या उच्च प्रतीचे विदेशी मद्यभारतीय बनावटीचे विदेशी मद्य व परराज्यातील मद्य अशा एकूण विविध क्षमतेच्या १२३ सिलबंद बाटल्या व १८ रिकाम्या बाटल्या असा एकूण ८ लाख ३७ हजार ६९२ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये झहीर होसी मिस्त्री यास महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ड) (ई) (फ)८०,८१,८३,९० अन्वये अटक करण्यात आली आहे. या आरोपीस न्यायालयासमोर हजर करण्यात आलेले आहे.

            ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कमुंबई आयुक्त कांतीलाल उमाप राज्य उत्पादन शुल्क, ठाणेचेविभागीय उप-आयुक्त सुनिल चव्हाणअंमलबजावणी व दक्षता संचालक श्रीमती उषा वर्मा तसेच मुंबई शहर अधीक्षक सी.बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षकराज्य उत्पादन शुल्क, “आय” विभाग मुंबई शहर कार्यालयाने केली असून वरील सर्व विदेशी मद्य नाताळ व नववर्षे सणानिमित्त विक्री करण्याचा उद्देश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास विनोद जाधवदुय्यम निरीक्षकराज्य उत्पादन शुल्कआय विभागमुंबई शहर हे करीत असून जवान एस.एस. जाधव यांनी गुन्ह्याची फिर्याद दिली.

            तरी जनतेस आवाहन करण्यात येते कीबनावट मद्य निर्मितीवाहतूकविक्री यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्र. १८०० ८३३ ३३३३ व व्हॉटस अप क्र. ८४२२००१९३३ संपर्क साधावाअसे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

कोराडी के प्रस्तावित पावर प्लांट स्थानांतरण से सरकार को करोडों-अरबों की चपत

Mon Dec 27 , 2021
  -कोराडी मे परियोजना निर्माण के लिए सभी सुविधा मौजूद नागपुर – कोराडी की प्रस्तावित विधुत परियोजना को रामटेक तहसील मे स्थानांतरण की योजना अघाडी तिकडी सरकार के खिलाफ खासी चर्चा का विषय बन रहा हैl इससे आघाडी सरकार मे बैठे जनप्रतिनिधियों का निकम्मापन उजागर होता है महाराष्ट्र शासन के वरिष्ठ अधिकारियों की अनभिज्ञता का नतीजा कोराडी के प्रस्तावित 660× […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com