भाग्य उजळले बहुजन समाजाचे,बाळासाहेबात पाहतो आम्ही प्रतिबिंब बाबासाहेबांचे – दादा कांबळे

संदीप कांबळे, कामठी

कामठी ता प्र 10 :- वंचित बहुजन समाजात आत्मसम्मान निर्माण करण्यासाठी 40 वर्षे प्रस्थापित व्यवस्थेविरोधात बंड करणारे, देशाच्या राजकारणाची दिशा बदलणारे, देशाच्या प्रत्येक प्रश्नांची उकल शोधणारे विद्वान व्यक्तिमत्त्व , फक्त बाबासाहेबांच्या रक्ताचेच नाही तर विचारांचे वारसदार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ऍड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त कामठी येथील बाल सदन अनाथलयात आयोजित फळ वितरण कार्यक्रमा प्रसंगी वंचित बहुजन आघाडी कामठी चे माजी शहराध्यक्ष व कामठी नगर परिषद चे माजी नगरसेवक प्रमोद उर्फ दादा कांबळे यांनी ऍड बाळासाहेब आंबेडकर संदर्भात भाग्य उजळले बहुजन समाजाचे बाळासाहेबात(आद.ऍड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर)आम्ही प्रतिबिंब पाहतो बाबासाहेबांचे…असे मत व्यक्त केले.
वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रिय अध्यक्ष व बहुजन नायक श्रध्देय ऍड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या ६८ वा.जन्म दिवस वंचित आज 10 मे ला वंचित बहुजन आघाडी कामठी तर्फे बाल सेवासदन अनाथ आश्रम कामठी येथील बालकांच्या हस्ते केक कापून व बालकांना फळांचा वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला .या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे  नागपूर जिल्हा .उपाध्यक्ष नरेश वाघमारे,नागपूर जिल्हा महासचिव प्रशांत नगरकर ,दादा कांबळे कैलास मुळे, कामठी अध्यक्ष दिपक वासनिक, अविनाश गजभिये ,, नितेश नागदेवे , राजेश ढोके,, अजय मेश्राम , यशवंत शेंडे, प्रवक्ता,माजी नगरसेविका मोहलता मेश्राम ,क्रुपाशंकर ढोके , सुनील पेंदाम, संजीवनी मेश्राम महिला कार्यकर्ते व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

उन्हाळी शिबिरातून विद्यार्थ्यांच्या तल्लख बुद्धीला चालना-आकाश भोकरे

Tue May 10 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 10:- बालक हे कुंभाराच्या कच्च्या मडक्यासारखे असतात.बालवयात त्यांच्यावर झालेले संस्कार त्यांच्या उभ्या आयुष्यभर सोबत घेऊन स्वतासह समाजाची सेवा करतात .त्यांच्यावर बालवयात झालेले संस्कार त्यांच्यातल्या बुद्धीला चालना मिळून उद्याचे भविष्य घडविण्याकरिता बाल संस्कार शिबिर,उन्हाळी शिबिर अनमोल ठरतात असे मौलिक प्रतिपादन 15 दिवसीय स्वच्छंद समर कॅम्प च्या उदघाटन कार्यक्रमाचे उदघाटक शिवभक्त आकाश भोकरे यांनी व्यक्त केले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com