१५ जणांचे घरे व खुले भूखंड जप्त : १५ दिवसांत कर न भरल्यास लिलाव
नागपूर : थकीत मालमत्ता कर न भरणाऱ्यांविरुद्ध मनपाने कठोर कारवाई सुरू केली आहे. बुधवारी (ता.१५) आशीनगर झोनमधील १५ थकीत मालमत्ता कर धारकांवर वॉरंटची कारवाई करण्यात आली असून त्यांचे घर व खुले भूखंड जप्त करण्यात आले आहेत. सदर थकीत कर धारकांना १५ दिवसांचा अवधी देण्यात आलेला असून १५ दिवसांच्या आत थकीत कराचा भरणा न केल्यास सदर मालमत्तेचा मनपाद्वारे लिलाव करण्यात येणार आहे. आशीनगर झोनचे सहायक आयुक्त अभिजित बावीस्कर यांच्या नेतृत्वात व सहायक अधीक्षक अनिल क-हाडे यांच्या मार्गदर्शनात कर निरीक्षक राजेश कडबे, लालप्पा खान, गुणवंत परबत, अश्विन कावळे, सुदर्शन वाहाने यांच्याद्वारे ही कारवाई करण्यात आली.