भाजयुमो उद्योग विकास मंचाची कार्यकारिणी गठीत..!

नागपूर – भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातुन एका नवीन आध्ययाची सुरूवात झाली. भाजयुमोतर्फे माजी खासदार व प्रसिद्ध उद्योगपती अजयजी संचेती यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या जन्मदिनाच्या दिवशी, भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके व भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांच्या संकल्पनेतुन व भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र पटले यांच्या पुढाकाराने भाजयुमो उद्योग विकास मंचाची स्थापना करण्यात आली.

समान विचारधारेतील तरूण एकत्रित येऊन नव-नविन उद्योग सुरू करतील तसेच नवीन उद्योगांना व उद्योजकांना प्रोत्साहन देतील. सध्या उद्योग विकास मंचाची स्थपना नागपुर येथे करण्यात आली आहे. भविष्यात उद्योग विकास मंच देशातील प्रत्येक शहरात सुरू करण्याचा आशावाद यावेळी अजय संचेती यांनी व्यक्त केला. काल नागपुर येथील स्टारबक्स येथे मंचाची प्रथम बैठक पार पडली.

बैठकीमध्ये भाजयुमो उद्येग विकास मंचाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. अध्यक्ष पदी सुलभ देशपांडे, उपाध्यक्ष पदी प्रणव घुगरे, सचिव पदी चंद्रभुषण महंकाळ व सौरभ जंगशेट्टीवार, कोषाध्यक्ष पदी गौरव टांगसाळे, सह- कोषाध्यक्ष पदी राहुल गुप्ता व सदस्य पदी आशय नलमवार आणि अभिजीत पौनिकर यांची घोषणा करण्यात आली.

यावेळी बैठकीला कपिल जोशी, अभिषेक काणे, सुधांशू प्रतापे, यश साबू, अथर्व गोगायन, मंदार काथोटे, वैभव सावरकर, यश पालटेवार, प्रणव पाटील, तेजस्विनी भांडारकर, रवी भांडारकर, श्रेयांश शाहू, सुमित खुणे, गोपी मोरघडे, दिनेश धोटे, निहाल वारगंटीवार, अनिकेत ढोले, अभिजीत पौनीकर, हृषीकेश देशपांडे, भक्ती आमटे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

किरण पारधी जि.प.सदस्य यांनी आपल्या क्षेत्रातील गावांची केली पाहणी

Tue Jul 12 , 2022
अमरदिप बडगे , प्रतिनिधी  गोंदिया – तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य किरण पारधी यांनी आपल्या क्षेत्रातील गावातील शाळा , अंगणवाडी आरोग्य केंद्राला भेट देऊन समस्या जाणुन घेतल्या . यामध्ये घोगरा गावातील शाळा व आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली तसेच त्यांच्याकडून समस्या जाणून घेतल्या. पाटील टोला गावातील शाळा जीर्ण झाली असुन याबाबत देखील समस्या जाणून घेतल्या , त्यानंतर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com