रासायनिक खतांच्या अति वापराने जमिनीतील मुख्य पोषक तत्वे नामशेष होण्याच्या मार्गावर

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 12:-आधुनिकतेच्या काळात नवीन तंत्र वापरून शेतीपिकांचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू असून उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीतील मुख्य पोषक तत्वे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे शेती बंजार होण्याची शक्यता आहे.
किमान दहा वर्षांपूर्वी शेतकरी शेती व्यवसायाबरोबर गाय, म्हैस, बैल, शेळ्या आदी पाळीव जनावरे पाळत असतात शेतीपूरक व्यवसाय म्हणूनही त्यांचा वापर होता.या पाळीव जनावरांचे शेण शेतीसाठी खत म्हणून उपयोगी येत होती या जनावरांची विष्ठाच खताचे काम करीत होते.
शेणखत जमिनीसाठी अत्यंत पोषक ठरत होती त्यामुळे शेतजमिनीतील पोषक तत्वांना बळ मिळत होते.जमिनीतील पोषक तत्वांना शेंणखतापासून कोणतीही हानी पोहोचत नव्हती .सोबतच पूर्णपणे निरोगी पिकापासून शेतकऱ्यांना भाजीपाला व इतरही पिके घेता येत होती .परिणामी उत्पादित पिकांचा दर्जाही अत्यंत चांगला राहत होता.पीक कसदार निघत होते त्यामुळे मनुष्यालाही कसदार अन्न मिळत होते.शेंणखतामुळे शेतीत उत्पन्नही भरपूर होत होते.विशेष म्हणजे ते सर्व कसदार राहत होते.पूर्वी शेतकरी खंडीचा हिशेब लावून खंडीने उत्पन्न झाले अशी चर्चा करीत होते.वयोवृद्ध शेतकरी गावातील पारावर बसून उत्पादना बाबत चर्चा करीत होते .खरीप आणि रब्बी पिकावर कोणत्याही रोगांनी आक्रमण केले की शेतकरी आपसात चर्चा करून त्यावर उपाययोजना करीत होते मात्र कालांतराने ही पद्धतच मोडीत निघाली.आता कोणत्याही गावात हे चित्र दिसून येत नाही.पीक चांगले राहण्याकरिता आता शेतकरी रासायनिक खतांचा भरमसाठ वापर करतात त्यामुळे शेतजमिनीचा पोतच खालावत आहे.सोबतच जमिनीतील अत्यंत सुपीक आणि पोषक तत्वे नष्ट होत आहेत.
सध्या पिकांना रासायनिक खतांचा डोज न दिल्यास उत्पन्नात घट येत असल्याचेही दिसून येते.परिणामी शेतकरीही त्याचा अतिवापर करतात .अधिक उत्पन्नासाठी त्याच्याकडे दुसरा पर्याय नाही .सिंचन सुविधा तोडकी असल्याने त्यांना कोरडवाहू जमिनीतून ज्यादा उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे.पूर्वी शेतकरी कोरडवाहू शेतात भाजीपाला लागवड करायचे त्यावर त्यांचा घरगुती खर्च भागत असे.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी कोरडवाहू शेतात भाजीपाला लावणेच बंद केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शासकीय उपजिल्हा रुग्णालयात जागतिक परिचारिका दिवस साजरा

Thu May 12 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 12:-आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस 12मे हा संपूर्ण जगात परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो .याच पाश्वरभूमीवर (आज12मे) ला जागतिक परिचारिका दिनानिमित्त शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सकाळी 10 वाजता वैद्यकीय अधिकारी डॉ , डॉ धीरज चोखांद्रे ,डॉ वाघमारे, डॉ अली यांच्या मुख्य उपस्थितीत आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करीत केक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!