माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीरसिंग आणि नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचेवर गुन्हे दाखल करून मोक्का अंतर्गत कारवाई करा

मा. मुख्यमंत्री साहेब , महाराष्ट्र राज्य , मुंबई

मा. गृहमंत्री साहेब , महाराष्ट्र राज्य , मुंबई

मा. अति. मुख्य सचिव , गृह विभाग , नागपूर

मा. पोलीस महासंचालक साहेब , म. रा. मुंबई

महिला आयोगाच्या अध्यक्षा यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचेही  माहिती पत्रकार परिषद घेऊन Jwala Dhote व अँड. सतीश महादेवराव उके यांनी  सांगितले.

नागपुर –  महाराष्ट्रात अब्दुल करीम तेलगीचा बनावट स्टँम्प पेपर घोटाळा सुरु असतांनाचे चे कार्यकाळात परमवीरसिंग हे ठाणे येथे कार्यरत होते . ठाणे येथे बनावट स्टँम्प पेपर , बनावट शेअर सर्टिफिकेट स्टँम्प तिकिटे , बनावट कोर्ट फी छापणारी प्रिंटीग प्रेस अब्दुल करीम तेलगीचा कारखाना कनिष्ठ पोलीस अधिकारी यांना सापडला होता . कनिष्ठ पोलीस अधिकारी यांनी वारंवार परवानगी मागूनही तो कारखाना सील करून जब्त करण्याची परवानगी परमवीर सिंग यांनी दिली नाही आणि तेलगीचे टोळी तो कारखाना पळविण्यात सफल झाली . याबाबत आपणाकडे संपूर्ण माहिती असेलच अधिक माहिती ठाणे पोलिसांचे जुने अभिलेखात व पोलीस अधीक्षक , गुन्हे अन्वेषण विभाग , कोकण विभाग (कोकण भवन, बेलापूर) नई मुंबई येथे मिळू शकेल . याचप्रमाणे ठाणे आणि मुंबई परिसरात अनेक लोकांचे कडून कोटयावधीची खंडणी वसुली पोलिसी कारवाईचा धाक दाखवून परमवीर सिंग यांनी केल्या , ह्या तक्रारी शासनाकडे पुराव्यानिशी आल्या आहेत. परमवीरसिंग याने त्याची वसुली टोळी चालविणे व विध्वंसक कृत्ये घडवून आणणे याबाबत शासनास सर्व माहिती असेलच . परमवीरसिंग यांनी या सर्व कृत्यातून कमविलेला हा पैसा व त्यातून कमाविलेली संपत्ती महाराष्ट्र संगठीत गुन्हेगारी अधिनियम यातील तरतुदीनुसार जप्त करणे शक्य आहे. याबाबत मी अधिक माहिती या अर्जात हा अर्ज आपणाकडे पोहोचेल तोपर्यत माजी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धार्जिणे अधिकारी यांना माहितीत येवून काही वेगळे घडू नये म्हणून येथे लिहिणे टाळत आहे .
नागपूर शहरात पोलीस स्टेशन धंतोली नागपूर येथे अप. क्र. २४३/२००० व पोलीस स्टेशन सीताबर्डी अप. क्र. ४०१/२००० हे गुन्हे बनावट स्टँम्प पेपर बाबत दाखल झाले होते. या दोन्ही गुन्ह्यात जप्त स्टँम्प पेपर कोणी कुठे तयार केले याबाबत तपास करण्यात आला नाही , हि माहिती लेखी उपलब्ध आहे त्याचप्रमाणे त्यातील आरोपी भरत शहा रा. MHB काँलोनी बिल्डींग नं. 28 , क़्वाँटर नं. १८५५, बोरीवली , मुंबई यास अटक करण्यात आली नाही. तपास ASI. API यांचेकडून करून घेण्यात आला. नागपूर परीक्षेत्रातील मुख्य सूत्रधार हा देवेंद्र फडणवीस याचेशी निगडीत होता आणि आताही आहे , याचे कागदोपत्री पुरावे उपलब्ध आहे , यामुळे हा तपास पूर्ण झाला नाही. या गुन्ह्यातील निकालात न्यायालयाने आरोपी निर्दोष सोडले त्यानंतर सन २०२१ मध्ये त्यातील एक आरोपी बिना अडवाणी गुन्हे शाखा नागपूर पोलिसांना पोलीस स्टेशन सदर नागपूरचे कार्यक्षेत्रात जुन्या तारखेचे स्टँम्प पेपर विकतांना मिळून आली. याचप्रमाणे सन २००६ – २००७ साल कार्यकाळात मी आर्किटेक व बिल्डर म्हणून काम करीत असतांना नागपुरात नागपुरात बनावट स्टँम्प पेपर घोटाळ्याचे पुरावे सापडले होते आणि त्याची तक्रार मी पोलीस उपायुक्त परी. क्र. २ नागपूर यांना दिली होती तेव्हा तेथे पोलीस उपायुक्त नागपूरचे सध्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार होते , त्यांनी ७ महिने हि तक्रार कसलीही कारवाई न करता बिनाकारवाईची ठेवली यावर मी माहितीचे अधिकारात माहिती मागविताच त्या मुख्य सूत्रधाराचे मागणीप्रमाणे आणि षड्यंत्राप्रमाणे ती तक्रार दडपण्याकरीता माझेवर दिवाणी न्यायालयात प्रलंबित प्रकरणात विषयात ६ गुन्हे खोट्या तक्रारीवरून दाखल करण्यात आले ( यात ४ गुन्ह्यात अमितेश कुमार यांची बदली झालेवर ब / क फायनल दाखल होवून गुन्हे नस्ती झाले आणि २ गुन्ह्यात मा. न्यायालयाने निर्दोष सोडले ) यात मला जास्त दिवस जेल मध्ये टाकून बनावट स्टँम्प पेपर घोटाळ्याची तक्रार दडपन्याकरिता मोका अंतर्गत कारवाई करता यावी म्हणून माझा भाऊ याचा काहीही सबंध नसतांना त्यास माझेसोबत आरोपी बनविण्यात आले होते . पहिला गुन्हा दाखल करताच अमितेश कुमार यांनी पोलीस स्टेशन कोराडी यांना आमचे विरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले होते . अमितेश कुमार यांची नंतर बदली झाली नंतर नवीन अधिकारी यांनी चौकशी करून त्या खोट्या तक्रारी करणारे तक्रारदारावर गुन्हे दाखल केले , सर्व बाबी अभिलेखावर आहेत . यात भरपूर आर्थिक घेवाण देवाण झाली होती, अमितेश कुमार मुख्य सूत्रधारास नावासमोर “जी” लावून उच्चारायचे.
त्या बनावट स्टँम्प पेपर टोळीने २००७ मध्ये पोलीस स्टेशन सदर नागपूर येथे खुलेआम “ते स्टँम्प पेपर विक्री करतात” असे लेखी बयान देत माझे विरुद्ध खंडणीचा गुन्हा खोटी तक्रार देवून दाखल करून घेतला होता त्यात न्यायालयात १६४ Cr. P. C. त्यांचे बयानही झाले होते. तपासअंती, त्यात न्यायालयात “ब फायनल” दाखल झाले होते . दि. ५.१०.२०२१ रोजी मा. न्यायालयाने या प्रकरणात बनावट स्टँम्प घोटाळयासहित पुढील तपास फिर्यादीचे बाबत करण्याचे आदेश दिले , त्यावेळी नागपुरात अमितेश कुमार पोलीस आयुक्त म्हणून आलेले होते. माझे समक्ष तत्कालीन गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाचे आदेशाने बारकाईने तपास करून कारवाई करण्याचे निर्देश सन २०२० च्या दिवाळीपूर्वी अमितेशकुमार दिले होते . परंतू बनावट स्टँम्प पेपर प्रकरणात ते स्टँम्प पेपर जप्त न करता व त्यापूर्वी न्यायालयात १६४ Cr. P. C. चे बयान त्या लोकांनी मा. न्यायालयासमक्ष दिले नाही असा अहवाल न्यायालयाला देवून बनावट स्टँम्प टोळीला वाचविण्यात आले. पोलीस स्टेशन अजनी नागपूर येथे अप. क्र. ३०३/२०१९ हा गुन्हा मा. न्यायालयाचे आदेशाने माझे तक्रारीवरून दाखल करण्यात आला , यात सुद्धा बनावट स्टँम्प पेपरचा आरोप आहे, हा बनावट स्टँम्प पेपर दि. २०.०३.२०२१ रोजी जप्त करण्यात आला. परंतु हा स्टँम्प पेपर कोणी कुठे तयार केला याचा तपास आरोपी अटक करून करण्यात आलेला नाही उलट देवेंद्र फडणवीसशी संबंधित त्या आरोपीच्या खोट्या तक्रारीवर मला त्रास देण्याची कोणतीही कसर नागपूर पोलिसांनी ठेवली नाही . या प्रकारे नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे छत्रछायेत हे सर्व आरोपी बिना कारवाईचे सुरक्षित आहेत.
या वरील देवेंद्र फडणवीस शी संबंधित बनावट स्टँम्प पेपर सूत्रधार याचे मदती करीता नागपुरातील मोक्याची जागा बनावट मालक तयार करण्याकरीता मुळ मालकास खोटे पद्धतीने मृत दाखवून मुन्ना यादव जो फडणवीस यांचा डावा हाथ आहे याने दि. २०.१०.२००३ रोजी नगरसेवक , नागपूर महानगर पालिका या लेटरहेड वर लिहून दिले होते . यात त्या जिवंत असलेल्या मालक स्त्रीने केलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सोनेगाव नागपूर येथे अप. २२/२००४ यात मुन्ना यादव याचे ते पत्र जप्त करण्यात आले . याबाबत मुन्ना यादव यास आरोपी बनविण्याबाबत नागपूर पोलिसात अमितेश कुमार यांचे कार्यकाळात अर्ज करण्यात आले परंतु काही कारवाई करण्यात आली नाही . मुन्ना यादव याचे विरोधात तलवारीने हल्ला करणे , जखमी करणे असे गुन्हे दाखल असून न्यायालयात दोषारोप आहे आता Spl. Case No. ५९०/२०१९ प्रमाणे कलम ४२०, ३५४,२९४,५०४,५०६,१२०-ब आणि Schedule Castes and Schedule Tribes (Prevention of Atrocities ) Act या प्रमाणे दोषारोप दाखल झाले आहे, परंतु कोणतीही मोठी कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे कार्यकाळात करण्यात आली नाही.
देवेंद्र फडणवीस , चंद्रशेखर बावनकुळे व इतरांचे विरुद्ध शेकडो कोट्यावधीच्या शासकीय जमिनीचे गबन व जमिनीचे घोटाळे , आर्थिक घोटाळे याच्या तक्रारी मी पुराव्यानिशी गेले ६ महिनेपुर्वीच केलेल्या आहेत , त्यात अनेक तक्रारीवर मा. विधानसभा अध्यक्ष महोदय व तत्कालीन गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांनी कारवाईचे आदेश दिले होते. या तक्रारीवर कारवाई झाली असती तर केंद्र शासनाचे प्रवर्तन निर्देशालय ED यावर आजपर्यंत कारवाई टाळू शकले नसते, पण त्यावर नागपूर पोलीसांचे कडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही किंवा त्यांचा निकाल मला कळविण्यात आला नाही . मला अशी विश्वसनीय गुप्त माहिती मिळाली कि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अश्या तक्रारीची माहिती बाहेर विशेष म्हणजे माझेपर्यंत पोहचू नये व कोणीही कनिष्ठ पोलीस अधिकारी यांनी माझेशी कसलेही बोलणे करू नये , माहिती देवू नये मला टाळून देण्यात यावे असे अलिखित निर्देश दिले आहेत, अशीही माहिती मिळाली कि या वरील तक्रारीची प्रत संभाव्य आरोपीचे कडे पोलिसांचे कडून पोहचली आणि त्यांचे आदेशाने त्या तक्रारी विनाकारवाईच्या दफ्तरी दाखल करण्यात आल्या .
देवेंद्र फडणवीस याचे गुंडांनी देवेंद्र फडणवीस विरुद्ध मी दाखल केलेला फौजदारी खटला न्यायालयात चालून त्यास शिक्षा होवू नये म्हणून डिसेंबर २०२० मध्ये माझे कार्यालयावर हमला केला मी तिथे मिळालो नाही म्हणून तेथील उपस्थितीत व्यक्तींना माझे नातेवाईकास मारहाण केली , दगडाने ठेचून जीवाने मारण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस स्टेशन अजनी नागपूर यांनी वरिष्ठांचे आदेशाने कलम ३०७ भा.द.वी. ऐवजी जामीनपात्र गुन्हा दाखल केला, त्या गुंडांचा जामीन देवेंद्रचे वकिलांनी घेतला , त्यादार्मियान आरोपींचे सबंधीतानी मला पोलीस स्टेशन येथे देवेंद्र फडणवीसशी त्याचे फोनवरुन बोलण्यास म्हटले होते, याची मी C. C. Camera रेकॉर्डिंग मागितली असता दिली नाही. यापूर्वी पोलीस आयुक्त नागपूर यांना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस सुरक्षा देण्यास निर्देशित केले होते परंन्तु विशेष शाखाचे अहवाल बाहेर देता येत नाही याचा गैरफायदा घेवून खोटे अहवाल निर्देशित करून मला पोलीस सुरक्षा नाकारली आणि नंतर हा हल्ला करण्यात आला .
नागपुरातून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे कार्यकाळात विशेष शाखा यांचे कडून देवेंद्र फडणवीस व शासनाचे अधिकारी लोकांचे गैरसबंध यांची माहिती गृहविभाग व सबंधित विभागास मंत्रालयात पोहचत नाही . नागपूरच्या सह धर्मदाय आयुक्त नागपूर ह्यांनी देवेंद्र फडणवीस याचे साथीदारांचे नाव अनेक शेकडो कोटीच्या ट्रस्ट मध्ये घातले आणि त्यांचे फडणवीस सोबत पिढीजात सबंध आहेत , त्या फडणवीसची ट्रस्ट National Cancer Hospital यात शेकडो कोटीचा घोटाळा केला गेला, फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधी त्यात दिला, याचे कोणतेही लेखापरीक्षण अहवाल धर्मदाय विभागास सादर नाहीत हे सर्व पोलीस तक्रारीत नमूद आहे तरीही आजपर्यत कारवाई नाही व शासनास नागपूर पोलिसांनी कळविले नाही. उलट नागपूरचे पोलीस अधिकारी त्या Hospital चे पिडीत व तक्रारदार रुग्नांचे नातेवाईक यांना खोटे आरोप लावून धमकावितात याचे व्हीडीओ उपलब्ध आहेत . चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी मंदिराची जमीन इतरांना दिली , विना विक्रीपत्र होता ७/१२ उतारा यावर मालकी बदलली, NMRDA यांनी त्या नवीन नावाने NA करून दिला यावर धर्मदाय आयुक्त कार्यालयाने काहीही कारवाई केली नाही याबाबत पोलीस तक्रारीवर काहीही कारवाई झाली नाही व शासनास नागपूर पोलिसांनी कळविले नाही. याप्रमाणे शेकडो कोटयावाधीचे हे घोटाळे आहेत.
नागपुरातील अनेक सरकारी वकील हे देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकाळातील व निकटवर्तीय आहेत यामुळे शासनाचे गुपिते फडणवीस पर्यत पोहचतात , यामुळे शासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होते अनेक मंत्री व खाते यांना अडचणीत आणले जाते . हि बाब नागपूर पोलिसांना त्या वकिलाचे नावानिशी माहिती आहे तरीही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे कार्यकाळात विशेष शाखा हि माहिती गृह खाते व विधी व न्याय खाते आणि मा. मुख्यमंत्री यांना कळवीत नाहीत. साध्याचे कार्यकाळात माहिती आयुक्त नागपूर विभाग या पदावर देवेंद्रचा खास व्यक्ती आरूढ झाला आहे , ज्याचे नाव देवेंद्रने त्याचे मुंबई येथील एका फौजदारी प्रकरणात त्याचे वतीने साक्षदार म्हणून लिहिले आहे, हा कधी कोणतीही माहिती देवेंद्रला देवू शकतो आणि सरकारी विभागास अडचणीत आणण्याचे काम करू शकतो , हि माहिती नागपूर पोलिसांचे कडून मंत्रालयास सादर करण्यात आली नाही.
करीता माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीरसिंग आणि त्यांनी ज्यांना कारवाई न करता मदत केली आणि त्यात आर्थिक लाभाची बाब घडली त्या समूहावर व नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरील प्रमाणे बनावट स्टँम्प व इतर प्रकरणात आरोपींना वाचविले षड्यंत्र रचली यात आर्थिक लाभाची बाबसुद्धा समाविष्ठ आहे या समूहावर गुन्हे दाखल करून मोक्का अंतर्गत कारवाई करणेबाबत हे निवेदन सादर आहे.

मा. पोलीस उपायुक्त , परी. क्र. ४ नागपूर
मा. पोलीस निरीक्षक , पोलीस स्टेशन अजनी / सदर नागपूर

अँड. सतीश महादेवराव उके

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

आम आदमी पार्टीचा भव्य तिरंगा मार्च

Fri Nov 26 , 2021
आम आदमी पार्टी येणाऱ्या मनपा निवडणुकीत पूर्ण ताकतीने उतरणार – आमदार विशेष रवी नागपुर – सर्वप्रथम आपण सर्वांना भारतीय संविधान दिवसाच्या शुभेच्छा आणि संविधान अनुरुप देशाला नवीदिशा देणाऱ्या आम आदमी पार्टी स्थापना दिवसाच्या ही शुभेच्छा ! यावर्षी देशाला स्वातंत्र मिळण्यास ७५ वर्षे पूर्ण झालीत. संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. आम आदमी पार्टी तर्फे देशात विविध ठिकाणी तिरंगा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com