संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 28 :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याद्वारे घोषित हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचा शुभारंभ केल्या जात आहे. नगर परिषद कामठी आणि तालुका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुनकर कॉलोनी स्थापित या आपला दवाखाना चे लोकार्पण ऑनलाइन पद्धतीने 1 मे महाराष्ट्र दिनी सकाळी 11.15 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी या उदघाटन सोहळ्याला विधानपरिषद सदस्य आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत तेव्हा या आपला दवाखाना च्या उदघाटन सोहळ्याला जास्तीत नागरिकांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन कामठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने यांनी केले आहे.शहरात सुरू करण्यात येणाऱ्या या आपला दवाखान्यात दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत रुग्ण तपासणी केल्या जाणार आहे.
सदर दवाखान्यात संसर्गजन्य आजारावर विशेष तपासणी व औषध उपचार करण्यात येतील. तसेच बी पी , , शुगर तपासणी ,आंधळेपणा,मुकबधिरपणा,मानसिक आजार,तंबाकू नियंत्रण कार्यक्रम कर्करोग,किशोरवयीन व वृद्धपकाळात उदभवलेले आजार याबाबत सुदधा औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तसेच सर्व प्रकारच्या सामान्य आजारावरही मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे.वरील सर्व सेवा ह्या शासनाकडून मोफत देण्यात येतील तेव्हा शासनाच्या या आपला दवाखानाचा लाभ कामठी शहरातील जनतेने घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने यांनी केले आहे.