द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपती पदाची शपथ

राष्ट्रपतीपदी विराजमान द्रौपदी मुर्मू यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा

         नवी दिल्ली :  द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांनी द्रौपदी मुर्मू यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या या समारंभास माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री व विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारंभास उपस्थित होते. या पदावर विराजमान होणाऱ्या द्रौपदी मुर्मू या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.

          द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पुढील कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राष्ट्रपती पदावर विराजमान झालेल्या द्रौपदी मुर्मू या पदाची शान आणखी वृद्धिंगत करतील. त्यांच्यामुळे भारताचा गौरव जागतिक स्तरावर आणखी उ़ंचावेल, असा सार्थ विश्वास आहे. त्यांच्या कारकिर्दीला आदरपूर्वक शुभेच्छा,’ असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

टॉपर छात्रों को दी बधाई

Tue Jul 26 , 2022
नागपुर/सावनेर –  स्थानीय अरविंद इंडो पब्लिक ,हेती (सुरला)  में कक्षा दसवीं का शत-प्रतिशत परिणाम के बाद स्कूल के प्राचार्य राजेंद्र मिश्र, गार्जियन डायरेक्टर एडवोकेट चंद्रशेखर  बरेठिया, स्कूल  सुपरवाइजर वंदना यादव एवं दसवीं की कक्षा शिक्षिका वंदना बारापात्रे ने प्रथम 5 टॉपर छात्र उदय गिरि, अंश रूसिया, उज्जवल बारापात्रे, देवम बुरहान, श्रेया बबले छात्रों के घरों में जाकर उनका हौसला बढ़ाया। […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!