संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
शिक्षक मतदार संघ निवडणूक : संजय निंबाळकरांच्या नावाची चर्चा.
कन्हान : – नागपुर विभागातील विधान परिषद शिक्षक मतदार संघासाठी होणाºया निवडणुकीच्या रिंगणात डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद रिंगणात उमेदवार उतरणार आहे. शिक्षकांच्या समस्यांची चांगल्या प्रकारे जाण असणारे तगळे उमेदवार परिषदे चे विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर यांना रिंगणात उतरविणार असल्याची चर्चा रंगु लागली आहे. व्यापक जनसंपर्क तसेच शिक्षकांच्या समस्यांची जाण असणारे निंबाळकर यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकी पुर्वीच नागपुर विभागातील वातावरण तापले आहे.
शिक्षक संजय निंबाळकर यांचे वडील शिक्षक होते. त्यांच्या धर्मपत्नी सुद्धा शिक्षिका आहे, शिक्षणाचा वसा असलेला परिवार तसेच मित्रांचा गोता वळा असलेले निंबाळकर ख-या अर्थाने शिक्षकांच्या समस्या सोडविणार असल्याचा कार्यकारिणीतील सदस्यांना विश्वास आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पप्पु पाटील भोयर, राज्याध्यक्ष शांताराम जळते, विभागीय महिला संघटक हर्षा वाघमारे, जिल्हाध्यक्ष नंदलाल यादव, जिल्हाध्यक्ष मेघराज गवखरे, जिल्हाध्य क्ष प्रविण मेश्राम, कार्याध्यक्ष गजानन कोगरे, उपाध्यक्ष संजु शिंदे, सचिव राजेश मालापुरे, विजय कांबळे, विनोद चिकटे, सचिव लोकोत्तम बुटले, सुरज बमनोटे, सपर्क प्रमुख अतुल बोबडे, रोशन टेकाळे, अश्विन शंभरकर, चुलबुल पांडे, अतुल बालपांडे, अविनाश श्रीखंडे, प्रमोद कडुकर, पक्षभान ढोक, योगेश कडू , पुष्पा कोडंलवार, उपाध्यक्ष गुणवंत देवाडे, चेतना कांबळे, प्रिया इंगळे, प्रा. शेषराव येलेकर, संजय पुंड, सतिश काळे, लक्ष्मण नेवल, कीर्ती कालमेघ, मोतीराम रहाटे, विनायकराव इंगळे, गजाननराव ढाकुलकर, प्रमोद वैद्य, पंकज निंबाळकर, सुनील बडबाईक, सुभाष तित्तरमारे, मारोती देशमुख, राहुल भोयर, देविदास इटनकर, संजय धरम माळी, प्रवीण घोडे आदीं सह अनेक छोट्या मोठ्या संघटनेसह पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात शिक्षकांचा संजय निंबाळकर यांना पाठिंबा असल्याचे दिसुन येत आहे.
शिक्षक -प्राध्यापकांना आरोग्य सेवा सुरू करावी, शिक्षकांचे पगार १ तारखेला करावे, अशा अनेक प्रलंबित मागण्यावर ही निवडणुक लढविणार. – संजय निंबाळकर
वडील, पत्नी तसेच मीसुद्धा शिक्षक असल्याने शिक्षकांच्या समस्या जवळून पाहिल्या आहे. त्या सोडविण्याकरिता निवडणूक लढण्याची तयारी असून, मोठ्याप्रमाणात शिक्षक तसेच विविध संस्था, संघटनांचा पाठींबा मिळत असल्याने बळ मिळत आहे. जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी, शिक्षकांना आदर्श पुरस्कार देताना भेदभाव करू नये, शिक्षक प्राध्यापकां च्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्या, कुठलीही मराठी शाळा बंद करू नये , विनाअनुदानित शाळा-कॉलेजला त्वरित मान्यता द्यावी, नवीन शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल करावा. शिक्षक-प्राध्यापकांना मोफत आरोग्य सेवा सुरू करावी, शिक्षकांचा पगार १ तारखेला करावा, अशा अनेक प्रलंबित मागण्यावर ही निवडणूक लढविणार.