विविध विकास कामांची केली पाहणी
नागपूर – माजी ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी पुन्हा एकदा आपल्या उत्तर नागपूर मतदारसंघाचा झंझावाती दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी गेल्या अडीच वर्षांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात सुरू केलेल्या विकासकामांचा आढावा घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. 

डॉ. नितीन राऊत यांनी नवा नकाशा, समतानगर, लष्करीबाग, कमाल चौक, टेका नाका, वैशालीनगर, मिलिंदनगर, बुद्धनगर, यादवनगर, हाऊसिंग बोर्ड कॉलनी आदी भागांना भेटी देऊन त्याठिकाणी सुरू असलेल्या सिमेंट रस्ते, डांबरीकरण, खडीकरण, नाल्यांच्या भिंतीचे बांधकाम, ग्रंथालय, समाजभवन, बौद्ध विहारातील बांधकाम, विपश्यना केंद्र, वॉकिंग ट्रॅक, बॅडमिंटन कोर्ट, ग्रीन जिम, उद्यान सौंदर्यीकरण आदी विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी एनआयटीच्या अधिकाऱ्यांना बांधकामाविषयी काही आवश्यक सूचनाही केल्या. प्रसंगी कृष्णकुमार पांडे, राजा करवाडे, बंडोपंत टेर्भुंणे, दिपक खोब्रागडे, सतिश पाली, आसिफ शेख, कल्पना द्रोणकर, प्रकाश नांदगावे, मुन्ना पटेल, निलेश खोब्रागडे, सादिक अली प्रामुख्याने उपस्थित होते.

नवा नकाशा येथील अशरफी मस्जिद, समतानगर येथील बुद्ध विहारातील विकास कामांसोबत डॉ. राऊत यांनी कमाल चौक येथील डॉ. आंबेडकर बाजार परिसरातील रस्त्याच्या बांधकामाची पाहणी केली. नागरी दलित वस्ती सुधार योजनेतून ही कामे पूर्ण केली जात आहेत.
डॉ. राऊत यांनी विकासकामांचा आढावा घेत असतानाच मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मंत्रिपद गेले असले तरीही सध्या सुरू असलेल्या विकासकामांमध्ये कुठलाही खंड पडू देणार नाही. आमदार म्हणून यापुढेही विकासकामांसाठी निधी खेचून आणण्याची ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. विकासकामांच्या प्रगतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. डॉ. राऊत यांनी आतापर्यंत केलेली विकासकामे लक्षात घेता, नागरिकांनी जागोजागी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या दौऱ्याप्रसंगी क्रृष्णा गजभीये, कुंदा खोब्रागडे, चेतन तरारे, इरशाद शेख, सचिन डोहाने, सतिश चोकसे, पुंडलिक मेश्राम, तुषार नंदागवळी, जिंतेद्र वाडेकर, मुन्ना सिपाही, अस्मिता पाटिल, रंजना मेश्राम, जिंतेद्र चव्हान, इंद्रपाल वाघमारे, विक्रम रामटेके, अशोक रामटेके, राजकुमार खांडेकर, दर्शना गेडाम, सुवर्णा चालखुरे, रितेश जगताप, संदिप सहारे, नरेश ठाकुर, दिनेश साधनकर, दुर्गा माटे, अनिरुद्ध गजभिये, रमेश माटे, भिवगडे ताई, सरोज खोब्रागडे, बरखा गोंडाणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.