डॉ.आंबेडकर महाविद्यालयाचे एन.सी.सी.चे माजी सार्जंट हरीश ढोबळे यांची तटरक्षक दलामध्ये असिस्टंट कमांडंटपदी निवड.

नागपूर – डॉ.आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी नागपूर येथील राष्ट्रीय छात्र सेना विभागातील माजी सार्जंट हरीश ढोबळे यांची नुकतीच नियुक्ती इंडियन कोस्ट गार्डच्या असिस्टंट कमांडंटपदी करण्यात आली आहे. ते सावनेर तालुक्यातील केळवद या छोट्याशा गावातील असून ढोबळेंनी एन.सी.सी च्या ‘सी’ सर्टिफिकेट परीक्षां ‘अ’ श्रेणीमध्ये उत्तीर्ण केली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या इंडियन कोस्ट गार्ड मधील नियुक्तीबद्दल त्यांचे नागपूर NCCचे कमांडर ग्रुप कॅप्टन एम.कलीम यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा नागपुर NCC ग्रुप हेडक्वार्टर मध्ये सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी 20 महाराष्ट्र बटालियन एनसीसी नागपूर युनिटचे लेफ्टनंट कर्नल संजय कदम, सुभेदार मेजर त्रीलोक सिंग व डॉ.आंबेडकर महाविद्यालयाचे एनसीसी विभाग प्रमुख प्रा. लेफ्टनंट डॉ. सुजित चव्हाण उपस्थित होते. या यशाबद्दल सर्वच स्तरातून हरीश ढोबळे चे कौतुक होत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

गुप्ता कोल वास वासरी च्या धुळामुळे शेतपिकाचे व ग्रामस्थाचे आरोग्य धोक्यात

Sat Dec 25 , 2021
-शेतक-यांची नुकसान भरपाई देऊन, कोल वासरी दुसरी कडे स्थातंरीत करण्याची मागणी.  कन्हान : – गट ग्राम पंचायत घाटरोहणा (येसंबा) व गट ग्राम पंचायत वराडा (वाघोली) शिवारा लगत येसंबा  गावा जवळ गुप्ता कोल वासरी महा मिनरल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी याच वर्षी सुरु झाली असुन ही कंपनी गावापासुन ५०० मीटर अंतरावर असुन कंपनीत पोक लँड व जेसीबी मशीनने उघडयावर कोळशा बारीक करून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com