जिल्ह्यात सिकलसेल नियंत्रण सप्ताहाचे आयोजन 11 ते 17 डिसेंबर

  – सप्ताहादरम्यान मोफत तपासणी

नागपूर दि.08 : सिकलसेल या गंभीर आजाराबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात 11 ते 17 डिसेंबर या कालावधीत सिकलसेल नियंत्रण सप्ताहाचे आयोजन  प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुगणालय, डागा स्त्री रुग्णालयात करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी या सप्ताहादरम्यान तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोगय अधिकारी  डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे.

या सप्ताहादरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुगणालय, डागा स्त्री रुग्णालयात प्राथमिक तपासणी मोफत करण्यात येत असून तपासणीमध्ये सकारात्मक येणाऱ्या रकत नमुन्याची इलेक्ट्रोफोरोसिस तपासणी व आवश्यकतेनुसार एचपीएलसी तपासणी करण्यात येणार आहे.

जनसामान्यामध्ये सिकलसेल आजाराबाबत उपचार, प्रसार व प्रतिबंधबाबत माहिती आरोग्य संस्थांद्वारे देण्यात येणारआहे. आवश्यतेनुसार औषधोपचार व संदर्भसेवा देखील देण्यात येणार आहे. त्यासोबतच डागा स्त्री रुग्णालयात डे केअर सेंटर रुग्णांच्या उपचारासाठी कार्यरत असून या सेंटरमार्फत वाहक व रुग्ण विवाहपुर्व कुटुंब नियोजन  नियमित उपचार व घ्यावयाची काळजीबाबत समुपदेशन व औषधोपचार करण्यात येणार आहे.

प्रसुतीपुर्व गर्भजल निदान तपासणीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच गर्भजल परीक्षणासाठी समुपदेशन केले जाणार आहे. डे केअर सेंटरमार्फत गंभीर स्वरुपाच्या रुगणांना हायड्रॉक्सी युरीया या विशेष औषधाची मोफत सोय करण्यात येणार आहे. सप्ताहादरम्यान सिकलसेल रुग्णांचा रक्त संक्रमणासाठी महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परीषदचे ओळखपत्र देखील तयार करण्यात येणार आहे

आजाराबाबत थोडक्यात…

सिकलसेल हा आजार गर्भधारणेच्या वेळी जेनेटीक बदलामुळे होतो. तसेच रक्तदोषामुळे उद्भणारा दुर्धर आजार असून जन्मापासून मनुष्याच्या अंतापर्यंत सोबत राहतो. रक्तात लाल व पांढऱ्या अशा दोन प्रकारच्या पेशी असतात. सर्वसाधारण व्यक्तीच्या शरीरात लाल रक्तपेशींचा आकार गोल असतो. परंतु सिकलसेल रुग्णात पेशीचा आकार ऑक्सिजन पुरवठयाअभावी विळयासारखा होतो. आई आणि वडील दोघेही सिकलसेलग्रस्त किंवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्यांना हा आजार होतो. अत्यंत दुर्धर व अनुवांशिक आजार म्हणून रक्त द्यावे लागते रक्ताचे प्रमाण कमी राहत असल्याने रुग्ण वारंवार आजारी पडतो. या गंभीर आजाराविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी 11 ते 17 डिसेंबर यादरम्याने नियंत्रण सप्ताह राबविण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

बसपा: संत जगनाडे जयंती संपन्न

Thu Dec 9 , 2021
नागपुर – संत तुकाराम महाराजांचे पट्टशिष्य संतशिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्ताने नागपूर शहर व जिल्हा बसपा तर्फे संत जगनाडे चौक नंदनवन येथील संताजीच्या पुतळ्याला आज बसपा चे जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, शहराध्यक्ष राजीव भांगे, जेष्ट नेते कृष्णाजी बेले, उत्तम शेवडे, महिला नेत्या वर्षाताई वाघमारे ह्यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. या प्रसंगी संताजी के सम्मान मे बीएसपी मैदान मे, संताजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!