जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र सुरू  खा.प्रफुल्ल पटेल यांच्या सुचनांचे पालन

गोंदिया : १ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र अनेक अडचणींना समोर करून केंद्रावर खरेदी सुरू करण्यात आली नव्हती. यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणी वाढत चालल्या होत्या. शेतकर्‍यांचे हित संबंध जोपासत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले. यानुरूप उद्या २४ नोव्हेंबरपासून केंद्रावर धान खरेदी होणार आहे. या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे शेतमाल विक्रीची समस्या मार्गी लागणार आहे.
गोंदिया व भंडारा जिल्ह्यात मार्वेâटिंग फेडरेशन तसेच आदिवासी विकास महामंडळ या दोन प्रमुख एजेंसीच्या नियंत्रणाखाली अभिकर्ता संस्थांच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. दिवाळीपूर्वी शेतमाल खरेदी करण्यात यावा, या अनुषंगाने खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. यानुरूप जिल्ह्यात १०४ व ४४ असे एकूण १४८ केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आली. तसेच  केंद्रांवर धान खरेदी सुरू करण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले होते. मात्र काही अडचणींना समोर करीत अनेक केंद्रावर धान खरेदी सुरू झाले नसल्याची बाब खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या निदर्शनास आली. यामुळे शेतकरी अडचणीत येत असल्याचे समजून आले. परिणामी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. तसेच जिल्हा व पणन यंत्रणेला कोणत्याही परिस्थितीत शेतकर्‍यांंचे हित संबंधात कसलीही तडजोड न बाळगता, धान  खरेदी केंद्र सुरू करण्याच्या सुचना केल्या. यानुरूप आजपासून जिल्ह्यातील  केंद्रावर धान खरेदी सुरू झाली आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या सुचनांचे पालन झाल्यामुळे जिल्ह्यातील धान खरेदीमध्ये येणारी अडचण मार्गी लागली आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या धान विक्रीचा प्रश्न सुटला आहे. यामुळे शेतकर्‍यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले आहे.
शेतकरी व अभिकर्ता संस्थांच्या समस्यांना घेवून मंत्रालयात बैठक
अभिकर्ता संस्थांच्या अनेक समस्या आहेत. यामुळे धान खरेदीमध्ये अडथळा निर्माण होत आहे. ही बाब खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या निदर्शनास आली. त्याच प्रमाणे शेतकर्‍यांचा बारदाण्याचा प्रश्न अभिकर्ता संस्थांच्या समस्या मार्गी लावण्याच्या अनुषंगाने खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री  यांच्याशी पाठपुरावा केला. त्यांच्या आग्रास्तव उद्या (ता.२४) मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अभिकर्ता संस्थांच्या मागण्या व समस्या, शेतकर्‍यांच्या अडीअडचणी या सर्व बाबींवर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीत पणन, प्रमुख एजेंसीचे प्रतिनिधी तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

कोल इंडिया लिमिटेड का राज्यों पर 20 करोड बकाया ?

Wed Nov 24 , 2021
– बिजली केन्द्रों मे पहुंच रहा है कम एवं घटिया दर्जे का कोयला नागपूर – देश के विभिन्न राज्यों में कोयले की कमी के कारण बिजली संयंत्र ठप होने की कगार पर हैlवही कम और घटिया दर्जे का कोयला की वजह से परियोजनाओं का दिवाला निकल रहा है। दूसरी ओर देश के सभी राज्यों पर कोल इंडिया कंपनी का 20 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com